भाजपच्या काळातील घोटाळ्यांची चौकशी करू असे म्हणणाऱ्या काँग्रेसने पुरावे असतील तर भाजप सरकार वरील 40 टक्के कमिशनचा आरोप कागदोपत्री सिद्ध करावा, असे आव्हान माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहे.
बेंगलोर येथे आज सोमवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, भाजपच्या काळातील घोटाळ्यांची चौकशी करू असे म्हणणाऱ्या काँग्रेसला मी सांगू इच्छितो की कृपया सर्व कांही तपासा आम्ही कधी? कसे? 40 टक्के कमिशन घेतले ते आम्हाला पुराव्यासह दाखवावे. काँग्रेस सरकारने 40 टक्के कमिशनच्या आरोपाची सर्व कागदपत्रे देण्यासंदर्भात मी रीतसर मागणी ही करणार आहे.
कंत्राटदार संघटनेने 40 टक्के कमिशनचा आरोप केला होता. आता त्यांचे सरकार आले आहे तेव्हा 40 टक्के कमिशनचा प्रश्न येणार नाही असे ते म्हणू शकतात. या पद्धतीने जर भविष्यातील सर्व निविदांमध्ये कमिशन हा प्रकारात कंत्राटदार संघटनेने काढून टाकला तर आमच्या काळात 40 टक्के कमिशन होते असे म्हणता येईल. त्यामुळे यापुढे कमिशनसह टेंडर काढले तर आता देखील 40 टक्के भ्रष्टाचार आहे असे म्हणावे लागेल, असे मत बोम्मई यांनी व्यक्त केले.
राज्यातील कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष केंपण्णा यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. यापुढे केंपण्णा यांनी त्यांच्या सर्व संघटनांना 40 टक्के तुटीसहनिविदा सादर करण्यास सांगावे. स्वतः केंपण्णा यांनी आत्तापर्यंत 40 टक्के कमिशनच्या आरोपाचे रेकॉर्ड दिलेले नाही, अगदी कोर्टा समक्षही नाही. त्यांनी आमच्याविरुद्ध अपप्रचार केला त्याचा फायदा अनायासे काँग्रेसने घेतला. आमच्या काळापासून काँग्रेसच्या आजच्या काळापर्यंत सर्व गोष्टींचा तपास होऊ द्या. या खेरीज पीएसआय भरती प्रकरणाचा तपास देखील होऊ द्या. सर्व प्रकरणातील सत्य बाहेर येऊ दे असे सांगून काँग्रेसच्या मागील कालखंडातील घोटाळे आम्ही पुराव्यांसह लोकायुक्तांकडे सादर केले आहेत, असे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.
एकंदर 40 टक्के कमिशनचा आरोप कागदोपत्री सिद्ध करा, असे जाहीर आव्हान माजी मुख्यमंत्री मुंबई यांनी काँग्रेसला दिले असून त्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया काय असणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.