कंठीरवा स्टेडियमवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यापेक्षा उत्तर कर्नाटकातील सत्ता केंद्र व या भागाच्या विकासाचे होकायंत्र असलेल्या बेळगाव सुवर्ण विधानसौधच्या प्रशस्त जागेत नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा व्हावा, अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी केली आहे.
राज्यात काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यात उत्तर कर्नाटकाची ही मोठी भूमिका आहे. त्यामुळे नवे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्री मंडळाचा शपथविधी सोहळा बेळगाव सुवर्ण विधानसौधच्या प्रांगणात घेऊन नवा इतिहास घडवावा.
शिवाय शपथविधी बेळगावात झाल्यास नवे सरकार उत्तर कर्नाटकाला न्याय देखील देईल, असे मत गुडगनट्टी यांनी व्यक्त केले आहे.
बेळगावच्या सुवर्ण विधानसौध समोर मोठे प्रांगण असून तेथे सुमारे दोन लाख लोक सामावू शकतील इतकी जागा आहे.
तेंव्हा कंठीराव स्टेडियमवर कोट्यावधी रुपये खर्च करण्याऐवजी शपथविधी सोहळा बेळगावच्या सुवर्ण विधानसभेत येथेच व्हावा, अशी मागणी बेळगाव करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुडनट्टी यांनी केली आहे