Monday, November 18, 2024

/

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय..!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षांचे विविध नेते प्रचासाठी कर्नाटक दौऱ्यावर येत आहेत. मात्र राष्ट्रीय पक्षांच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या विरोधार्थ प्रचाराचा सपाटा सुरु केला आहे.

याविरोधात आज समिती कार्यकर्ते आक्रमक झाले. आज देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्या प्रचारसभेदरम्यान समिती कार्यकर्त्यांनी काळे निशाण दाखविल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना लक्षात घेऊन सीमाभागात प्रचार करणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचे सीमाभागात स्वागत होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कर्नाटकात ६ आणि ८ मे रोजी प्रचारासाठी येणार होते. मात्र आज टिळकचौक आणि बेनकनहळ्ळी येथील राष्ट्रीय पक्षांच्या जाहीर सभेदरम्यान समिती कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सातत्याने महाराष्ट्राच्या नेत्यांशी संपर्क साधून, येथील परिस्थितीची जाणीव करून देऊन देखील समिती उमेदवारांच्या विरोधार्थ अनेक नेत्यांनी सीमाभागात हजेरी लावली. या निषेधार्थ आज समिती कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदविला.Eknath shinde

बेळगावमध्ये झालेल्या या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातदेखील उमटले. एकनाथ शिंदे यांचाही दौरा कर्नाटकात आयोजिण्यात आला होता. मात्र हि परिस्थिती पाहून एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकात प्रचारासाठी आलो तरीही सीमाभागात प्रचारासाठी येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

कर्नाटकात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते येणार आहेत. मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.