कर्नाटकातील बेळगाव, तुमकुर आणि हासन छत्तीसगड मधील दुर्ग केरळ मधील एर्णाकुलम आणि तामिळनाडूमधील त्रिपुरा यासारख्या लहान शहरांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या वापरात लक्षणीय वाढ झाली असून या ठिकाणची इलेक्ट्रिक स्कूटर्सची आवक 35 ते 60 टक्के इतकी असल्याचे ओला इलेक्ट्रिक या कंपनीने स्पष्ट केले आहे.
ओला इलेक्ट्रिक कंपनीचे सीएमओ अनशूल खंडेलवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार इलेक्ट्रिक स्कूटर्सची बेळगावमध्ये 50 ते 60 टक्के, दुर्गमध्ये 35 ते 40 टक्के आणि त्रिपुरामध्ये 30 टक्के आवक आहे.
त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर वापराच्या बाबतीत या शहरांची तुलना आता बेंगलोर, पुणे, सुरत आणि जयपुर या मोठ्या शहरांशी होऊ लागली आहे.
सध्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या वापरामध्ये गुजरात, महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटक ही राज्य देशात आघाडीवर आहेत. येत्या दोन महिन्यात ओला इलेक्ट्रिक आपल्या एक्सपिरीयन्स सेंटरची संख्या 1000 पर्यंत वाढवणार आहे.
बेळगावात बॉक्साइट रोड आणि खानापूर रोड तिसऱ्या रेल्वे गेट टिळकवाडी अशा दोन ठिकाणी ओला इलेक्ट्रिकची दोन एक्सपीरियंस सेंटर्स आहेत.