महापालिकेने सर्वसामान्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी सदाशिवनगर व शहापूर स्मशानभूमीत उपलब्ध करून दिलेला गोवऱ्यांचा साठा संपला असल्यामुळे अनेकांना लाकूड खरेदी करून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. तेंव्हा स्मशानभूमीत पुन्हा गोवऱ्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी वाढू लागली आहे.
महापालिकेने सर्वसामान्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी सदाशिवनगर व शहापूर स्मशानभूमीमध्ये गोवऱ्या मोफत उपलब्ध करून दिल्या होत्या. गोवऱ्या खरेदीसाठी महापालिकेने 50 लाख रुपयांची तरतूद केली आहे.
या निधीतून प्रारंभी गोवऱ्यांची खरेदी करण्यात आली होती. त्यानंतर कांही काळ गोवऱ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र गेल्या दोन महिन्यापासून सदाशिवनगर व शहापूर स्मशानभूमीतील गोवऱ्या पूर्णपणे संपल्या आहेत.
महापालिकेतर्फे गोवऱ्या खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद असतानाही नव्याने गोवऱ्या खरेदी करण्यात आलेल्या नाही. निधी उपलब्ध असतानाही गोवऱ्या का खरेदी केला जात नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.