Monday, January 6, 2025

/

महिला विद्यालय मराठी शाळेच्या शतक महोत्सवाला शनिवारपासून प्रारंभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील मराठी माध्यमातील मुलींची एक अग्रेसर शाळा या दृष्टीने महिला विद्यालय हायस्कूलकडे आदराने पाहिले जाते. या महिला विद्यालय मंडळाचा व महिला विद्यालय हायस्कूलचा शतक महोत्सव शनिवार दिनांक 27. 5. 2023 व रविवार दिनांक 28. 5. 2023 रोजी महात्मा गांधी भवन कार्यालय बेळगाव येथे कार्यक्रम संपन्न होत आहे.

पहिल्या दिवशी मुख्य कार्यक्रम व दुसऱ्या दिवशी माजी विद्यार्थिनींचा आनंद सोहळा आयोजित केलेला असून हा बेळगावकर मराठी भाषिकांसाठी अतिशय चांगला ‘मणी कांचन’ योगच आहे. शाळेच्या स्थापना दिनादिवशी दि.27.5.2023 रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला मा. डॉ. सौ. निशिगंधा वाड ( अभिनेत्री) शाळेच्या माजी विद्यार्थिनी पद्मश्री डॉ. इंदिरा हिंदुजा ( पहिली टेस्ट ट्यूब बेबी निर्मिणाऱ्या डॉक्टर) या अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. रविवार दि.28.5.2023 रोजी माजी विद्यार्थिनींचा आनंद सोहळा व माजी शिक्षकांचा गौरव आयोजित केला असून यावेळी महिला विद्यालय मंडळ संस्थेच्या कार्याध्यक्ष डॉ. शोभा शानभाग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार असून प्रा. डॉ. माधुरी शानभाग यांचे व्याख्यान होणार आहे.

महिला विद्यालय हायस्कूलचा अमृत महोत्सव दिनांक ८ व ९ जानेवारी २००० रोजी डॉक्टर अशोक साठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर द. ना. धनागरे व प्राध्यापक देवदत्त दाभोळकर माजी कुलगुरू पुणे विद्यापीठ या व्यतिरिक्त प्राध्यापिका लीला पाटील, श्रीमती सुमित्रा भावे, श्रीमती मीरा भागवत चेअरमन श्री न. श्री. फडके, कार्यवाह श्री प्रभाकर बिष्णु प्रभारी मुख्याध्यापक श्री एस. बी. नाईक व इतर शिक्षक वर्ग याच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी अमृतधारा स्मरणिकेचे प्रकाशन डॉक्टर द.ना. धनागरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले होते.

कोणतीही व्यक्ती किंवा एखादी संस्था उत्तुंग शिखरावर पोहोचण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा हातभार पुरेसा नसून ती संस्था मानाने उभी राहण्यासाठी शाळेच्या विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थेचे पदाधिकारी, देणगीदार, हितचिंतक शिक्षण प्रेमी व सामाजिक कार्यकर्ते यांचे अथक परिश्रम कारणीभूत ठरत्रात स्त्री शिक्षणाचा उत्तुंग वसा महाराष्ट्रभर पसरविणारे भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांच्या प्रेरणेने त्यांच्या परिश्रमाचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या अतिशय कष्टाळू शिस्तप्रिय शाळेच्या आद्य संचालिका के बनुबाई अहो यांच्या साथीने महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी दिनांक 25.5.1923 रोजी प्रसिद्ध वकील कै. श्री दत्तोपंत बेळवी यांच्या साथीने महिला विद्यालय मंडळाची स्थापना केली व दि. 27 मे 1923 रोजी महिला विद्यालय हायस्कूलची सुरुवात करून स्त्री शिक्षणाची बेळगाव सारख्या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी मुलींना शाळेत पाठवणे हे धाडसच होते परंतु कुमारी गोदावरी बेळवी, चंदू मुजुमदार व गोदावरी खोत या तीन मुलींना घेऊन मनुबाई अहो यांनी शाळा सुरू केली स्वतः अण्णासाहेब कर्वे यांनी शाळेत पहिला तास घेतला या ऐतिहासिक घटनेची नोंद आज या शतक महोत्सवात करणे अतिशय योग्यच ठरेल, कारण शतक महोत्सव साजरा करताना पहिल्या पावलाची आठवण आपल्याला सुवर्णक्षणाकडे घेऊन जाते. अनेक संकटांना काळानुरूप येणाऱ्या समस्यांना सामोरे जात रातकाची ही पहाट उगवली, त्यात शुक्रतारा असलेली आमची शाळा सुरुवातीला सोशल क्लच त्यानंतर क्रीडा भवन अतिथी गृह सुंठणकर वाडा अशी स्थलांतरित करत आज बेळगाव शहराच्या मध्यस्थानी म्हणजेच कॉलेज रोडवर मोठ्या दिमाखाने उभी आहे.Mahila vidhyalay

इयत्ता सहावी ते इयत्ता दहावी अनुदानित असलेली ही शाळा कोरोना लॉक डाउन त्या पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे असणारा कल आणि कन्नड भाषेचे वाढते प्रस्थ या सान्या आव्हानांना पेलून आजच्या या मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्याच्या स्पर्धेत ४०० विद्यार्थिनी सह उत्तमरीत्या वाटचाल करत आहे. शाळेची दिमाखदार व ऐतिहासिक इमारत, भव्य पटांगण, सुसज्ज प्रयोगशाळा, इंटरनेट युक्त संगणक कक्ष, प्रशिक्षित असा शिक्षक वर्ग, शाळेतील विविध वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक सुविधांमुळे आसपासच्या परिसरातील विद्यार्थिनी व पालकांचा शाळेप्रती विश्वास वाढलेला दिसून येत आहे.

या शैक्षणिक वाटचालीत व विकासात महिला विद्यालय मंडळाचा मोलाचा अमूल्य असा वाटा आहे. या शाळेत शहराबरोबर आसपासच्या खेड्यातून मुली शिक्षण घेण्यासाठी येतात. शाळेचा एस.एस. एल.सी चा निकाल दरवर्षी चांगला लागत असून मार्च 2022 चा निकाल ९४.०७% लागला असून परीक्षेला बसलेल्या 118 विद्यार्थिनींपैकी 111 विद्यार्थिनी पास झालेल्या आहेत. त्यामध्ये विशेष प्राविण्य 8 प्रथम श्रेणी 71, द्वितीय श्रेणी 25, पास श्रेणी 7 मिळवलेल्या असून कर्नाटक एस. एस.एल.सी बोर्डाकडून शाळेला सरासरी ‘ए’ श्रेणी मिळालेली आहे. ही अत्यंत गौरवाची बाब आहे.

विविध ठिकाणी होणाऱ्या आंतरशालेय स्पर्धेत आमच्या शाळेतील मुली हिरीरीने भाग घेतात. विज्ञान प्रदर्शन क्रीडा स्पर्धा, प्रक्षमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व, निबंधलेखन, समूहगीत गायन, वैयक्तिक गायन स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचा नावलौकिक द्विगुणीत केला आहे. आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थिनींची परंपरा पाहिल्यास यशाचा दरवळ सर्वत्र पसरलेला दिसून येतो. प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारी विद्यार्थिनींची परंपरा शाळेला लाभली आहे. भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी तयार करणाऱ्या पद्मश्री डॉ. इंदिरा हिंदुजा, मराठी साहित्यातील नामवंत कवयित्री श्रीमती इंदिरा संत, वैमानिक सौ. गीता गोडबोले, मराठी अभिनेत्री उषा नाईक इत्यादी. आजच्या सद्यस्थितीला जिल्हाधिकारी असलेल्या मौसमी चौगुले तसेच प्राध्यापिका, वकील, उद्योजिका, चार्टर्ड अकाउंटंट, समाजसेविका, गायिका, नृत्यांगना तसेच उच्च शिक्षण क्षेत्रात प्राचार्य वगैरे उच्च पदावर अनेक विद्यार्थिनी विराजमान आहेत.Mahila vidhyalaya

या शाळेचा शतक महोत्सव शनिवार दिनांक 27. 5. 2023 रोजी सकाळी दहा ते दोन या सत्रात महिला विद्यालय मंडळाचे अध्यक्ष श्री भगवानदास कपाडिया यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न होईल. प्रथम सत्रात ग्रंथदिंडी काढण्यात येईल त्यानंतर स्वागत मान्यवरांचा परिचय, स्मरणिकेचे प्रकाशन, पाहुण्यांची भाषणे वगैरे कार्यक्रमाचा समावेश यात आहे. या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी निर्मिणाऱ्या पद्मश्री डॉ. इंदिरा हिंदुजा तर प्रमुख अतिथी व वक्त्या म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री असलेल्या माननीय डॉ. सौ. निशिगंधा वाड तसेच महिला विद्यालय मंडळाचे सर्व पदाधिकारी, माजी शिक्षक वर्ग व माजी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. शतक महोत्सवाचे अवचित्य साधून शततरंग या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. दुपारच्या सत्रात माजी व आजी विद्यार्थिनीचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतील.

दि. २८ में 2023 रोजी महात्मा गांधी भवनमध्ये माजी विद्यार्थिनींचा आनंद सोहळा व माजी शिक्षकांचा सत्कार तसेच व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी महिला विद्यालय मंडळाच्या कार्याध्यक्ष डॉ. सौ शोभा शानभाग यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर माधुरी शानभाग यांचे कालातीत बहिणाबाई- नवा दृष्टीक्षेप या विषयावर व्याख्यान होणार आहे. शतकमहोत्सवाचा सोहळा अतिशय यशस्वी व बहारदार व्हावा पाकरिता आयोजलेल्या सर्व उपक्रमासाठी आजी व माजी विद्यार्थिनी, सामाजिक संस्था शिक्षण प्रेमी यांचे सहाय्य मोलाचे ठरणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.