बेळगाव लाईव्ह : बेळगाव स्मार्ट सिटी म्हणून जरी नावारूपास आले असले तरी बेळगावमधील मूलभूत सुविधा अद्यापही प्रगतीपासून वंचित आहेत याचा प्रत्यय अनेकवेळा येत असतो.
सोमवारी शहराच्या मध्यवर्ती भागात देखील अशाच प्रकारावरून ‘बेळगाव लाईव्ह’ ने वृत्त प्रकाशित केले होते. ‘भातकांडे गल्ली परिसरात अंधाराचे साम्राज्य’ या मथळ्याखाली प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल प्रशासनाने घेतली असून मंगळवारी सायंकाळी भातकांडे गल्ली परिसरातील पथदीप सुरु झाले आहेत.
बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागाला जोडणाऱ्या गल्ल्यांपैकी एक असणाऱ्या भातकांडे गल्ली येथे गेल्या १५ दिवसांपासून पथदीप बंद अवस्थेत होते. या भागात नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
मात्र १५ दिवसांपासून हा परिसर अंधाराच्या साम्राज्यात वावरत होता. सायंकाळच्या वेळेस अंधारामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा होत होती.
या भागाच्या लोकप्रतिनिधींनी तातडीने हि समस्या सोडविण्याची मागणी केली जात असल्याचे वृत्त ‘बेळगाव लाईव्ह’ ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत तातडीने मंगळवारी पथदीप सुरु झाले आहेत.