महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांचा एकमेव आवाज बेळगाव दक्षिण मतदार संघात ऐकायला मिळत आहे. यामुळे विरोधकांचे अक्षरशः धाबे दणाणले आहेत.
नकारात्मक प्रसिद्धी करून सुद्धा रमाकांत दादांचा करिष्मा कमी होत नाही, त्यामुळे करायचे काय? असा प्रश्न विरोधकांसमोर निर्माण झालाय. पैशांचा पाऊस आणि मटणाचा महापूर केला तरी मतदारांचा कौल रमाकांत दादा यांच्याकडे असल्याने आता राष्ट्रीय पक्ष अडचणीत आले आहेत.
बेळगाव दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण मध्ये जनतेची सुनामी आल्याचे वातावरण आहे .महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी जनता एखाद्या समुद्र सारखी रस्त्यावर उतरू लागली आहे. हे चित्र आश्वासक आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने श्रीराम सेना हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांना उमेदवारी दिल्यानंतर प्रतिस्पर्धी उमेदवारांचे धाबे दणाणले होते. प्रचारामध्ये आघाडी घेतलेल्या रमाकांत दादांनी आपला करिष्मा सुरूच ठेवलाय. विकासाच्या खोट्या वल्गना रमाकांत दादांच्या जलवासमोर फुक्या ठरल्या असून त्यामुळे दक्षिणेत एकमेव आवाज रमाकांत दादा एकच वादा असा ऐकू येऊ लागलाय. यामुळे राष्ट्रीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत.
गल्ली गल्लीत, संघटना संघटनांमध्ये आणि कोपऱ्या कोपऱ्यावर रमाकांत कोंडुस्कर हे एकमेव नाव आणि महाराष्ट्र एकीकरण समिती ऐकू येऊ लागल्यामुळे प्रत्यक्षात बेळगाव दक्षिण मतदार संघाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय.भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या नावाखाली निवडणूक लढवण्याचा फंडा आता संपला आहे. कर्नाटकात काँग्रेसचे वारे वाहू लागले त्यामुळे भाजपला सरकार स्थापन करावयाचे झाल्यास अपक्ष उमेदवारांची गरज लागणार आहे.
मात्र समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारानी नरेंद्र मोदी यांची ताकद कर्नाटक राज्यात कमी झाली तरी चालेल देश हितासाठी त्यांना निवडून देऊया. मात्र आता आपल्या वैयक्तिक आवाजाला वैयक्तिक अस्तित्वाला मदत करणाऱ्या नेत्याला निवडून देऊया. अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे रमाकांत दादांचा एकच आवाज सुरु आहे. 2013 च्या विधानसभा निवडणुकीत जसे वातावरण तयार झाले होते त्याच पद्धतीचे वातावरण आता तयार झाल्यामुळे विरोधकांना पळता भुई थोडी झाली आहे.