कारगिल युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने आणि माजी सैनिकांच्या आग्रहाखातर विश्व भारती कला क्रीडा फाउंडेशनतर्फे येत्या 4 जून 2023 रोजी भव्य मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे.
हनुमान मंदिर, खानापूर येथे विश्वभारत कला क्रीडा फाउंडेशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पुणे येथील शरहरत फाउंडेशन या संस्थेमार्फत गेली पाच वर्ष दर 16 सप्टेंबर रोजी मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन केले जाते. त्यांच्या प्रेरणेने विश्वभारत कला क्रीडा संघटनेतर्फे यावेळी पहिल्यांदाच 4 जून रोजी मॅरेथॉन शर्यत घेतली जाणार आहे. या शर्यतीतील विजेत्या खेळाडूंना कारगिल येथील 16 सप्टेंबर 2023 रोजी होणाऱ्या कारगिल मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे विजयी स्पर्धकांना आकर्षक बक्षीसे तसेच प्रशिक्षण उपलब्ध करण्याची संधी संघटनेमार्फत देण्यात येणार आहे. तरी या संधीचा सर्व खेळाडूंनी लाभ करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विश्वभारत कला क्रीडा संघटना आयोजित मॅरेथॉन शर्यत एकूण पाच गटात घेण्यात येईल. 1) खुल्या गटासाठी (वयोमर्यादा 18 वर्षावरील) फुल मॅरेथॉन, अंतर 42.195 कि.मी., प्रवेश फी प्रत्येकी 700 रुपये. 2) पुरुष व महिला गटासाठी (18 वर्षावरील) हाफ मॅरेथॉन, अंतर 21 कि.मी., प्रवेश फी 600 रु. 3) पुरुष व महिला गटासाठी (18 वर्षावरील) 10 कि.मी. मॅरेथॉन, प्रवेश फी 500 रु. 4) पुरुष व महिला गटासाठी (वयोमर्यादा 35 वर्षांवरील)
10 कि.मी. मॅरेथॉन, प्रवेश फी 500 रु., 5) ड्रीम मॅरेथॉन सर्वांसाठी खुली प्रवेश फी 300 रुपये. शर्यतीसाठी स्पर्धकांकडे मेडिकल सर्टिफिकेट आणि आधार कार्डसह डिजिटल पेमेंटची सुविधा असणे आवश्यक आहे. तरी शर्यतीत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी 9591451091 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.