केपीसीसी कार्याध्यक्ष आणि नूतन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने दिल्ली मुक्कामी एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सदिच्छा भेट घेऊन कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
बेळगावातील काँग्रेस आमदारांची शिष्टमंडळ सध्या केपीसीसी कार्याध्यक्ष नूतन मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथे मुक्काम ठोकून आहे.
सदर आमदारांमध्ये जारकीहोळी यांच्या समवेत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार असिफ उर्फ राजू सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, कुडचीचे महेंद्र तमन्नावर, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य आदींचा समावेश आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील भेटीस आलेल्या सर्व आमदारांचे सहर्ष स्वागत करून त्यांना आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांना शुभेच्छा दिल्या.
खर्गे यांच्या या भेटीच्या निमित्ताने आता आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार महांतेश कौजलगी यांच्या मंत्रीपदाच्या शर्यतीची चर्चा सुरू आहे.