Wednesday, January 8, 2025

/

मतदान, मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज -जिल्हाधिकारी

 belgaum

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान आणि त्यानंतर 13 मे रोजीची मतमोजणी प्रक्रिया पारदर्शीपणे शांततेने व्यवस्थित पार पडावी यासाठी आवश्यक सर्व तयारीसह निवडणुकी यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यात सुरळीत मतदानासाठी एकूण 21,688 निवडणूक कर्मचारी आणि मतमोजणीसाठी एकूण 1188 कर्मचारी कार्यरत राहतील, अशी माहिती बेळगाव जिल्ह्याचे मुख्य निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. तसेच प्रचार समाप्त झाल्या असल्यामुळे परगावच्या लोकप्रतिनिधींनी आता वापस आपापल्या गावी जावे, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्याचे मतमोजणी केंद्र असलेल्या टिळकवाडी येथील आरपीडी महाविद्यालयामध्ये आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शहर पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. संजीव पाटील व संबंधित अन्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक निर्वाचन अधिकारी नितेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात पाच सहाय्यक मतदान केंद्रांसह एकूण 4,439 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, प्रतीक्षा निवारा, पाणी सुविधेसह टॉयलेट या सुविधा उपलब्ध असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदार मदत कक्ष मतदारांच्या सहाय्यासाठी सज्ज असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांपैकी 50 टक्क्याहून अधिक केंद्रे वेब कास्टेड असतील. या केंद्रांमध्ये संवेदनाशील, असुरक्षित यासारख्या केंद्रांचा समावेश असेल.

त्याचप्रमाणे या केंद्रांच्या परिसरात व्हिडिओग्राफर तैनात असतील. जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 576 मायक्रो ऑब्झर्व्हर्ससह एकूण 21,688 निवडणूक कर्मचारी त्याचप्रमाणे मतमोजणीसाठी 360 मायक्रो ऑब्झर्व्हर्ससह एकूण 1188 कर्मचारी तैनात असतील.

बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 360 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर एकूण 234 उमेदवारांपैकी 25 जणांचे अर्ज फेटाळण्यात आले तर शेवटच्या दिवसापर्यंत 47 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सध्या निवडणूक रिंगणात एकूण 187 उमेदवार असून यामध्ये 174 पुरुष आणि 13 महिला उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये भाजपच्या 18, काँग्रेस 18, आप 15, बीएसपी 8, निजद 17, आरयुपीपी 43 आणि स्वतंत्र 68 उमेदवार आहेत.Dc press meet

यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी 3967574 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 18 ते 19 वर्षे वयाचे 94652 युवा मतदार आहेत. त्याचप्रमाणे 151 तृतीयपंथीय आणि 1,00,095 वय वर्षे 80 वरील ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत. मतदानासाठी मतदार ओळखपत्र (ईपीआयसी) अथवा आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, पोस्ट किंवा राष्ट्रीयकृत बँकांचे छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत मिळालेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयने अदा केलेले स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेली पेन्शन कागदपत्रे यापैकी कांही एक सादर करणे आवश्यक आहे. मतदान प्रक्रिया 10 मे रोजी सकाळी 7 वाजता सुरू होऊन सायंकाळी 6 वाजता समाप्त होईल.

मतदानानंतर आरपीडी महाविद्यालय आवार बेळगाव येथे 13 मे 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदानाची मतमोजणी केली जाईल. त्या दिवशी सकाळी आठ वाजता ईव्हीएम मशीन्सच्या मतांची मतमोजणी सुरू होईल. तत्पूर्वी अर्धा तास आधी टपालाद्वारे आलेल्या मतपत्रिकांची मोजणी केली जाईल. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी प्रत्येक मतदार संघाच्या ईव्हीएम मतमोजणीसाठी 11 टेबल असतील. त्याचप्रमाणे 2 टेबल पोस्टल मतपत्रिका मोजण्यासाठी आणि 1 टेबल ईटीपीबीएस साठी असेल. या निवडणुकी यंत्रणेसह मतदान आणि मतमोजणी प्रसंगी कडक सुरक्षा व्यवस्था राखली जाणार असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.