बेळगाव लाईव्ह : बेळगावचे नाव अनेक क्षेत्रात चमकत आले आहे. विविध क्षेत्रात उत्तम कार्य करून बेळगावच्या नावलौकिकात आणखीन भर पाडण्याचे काम बेळगावसह प्रदेशात विसावलेल्या नागरिकांनीही केले आजवर केले आहे.
याचप्रमाणे लंडनमध्ये बेळगावच्या युवतीने ‘मिस आशिया’ स्पर्धेचा किताब जिंकून बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे.
सालाबादप्रमाणे लंडनमधील भारतीयांनी एजीएलपी इंटरप्रायझेस अंतर्गत आयोजित केलेल्या मिस आशिया जी. बी. २०२३ या स्पर्धेत आर्या नाईक या युवतीने यश मिळविले आहे.
बेस्ट कॅटवॉक, बेस्ट टॅलेंट आणि पीपल्स चॉईस अवॉर्ड टायटल मिळवून आर्या नाईकने सहाव्या फेरीत ‘मिस आशिया जीबी २०२३’ हा किताब पटकाविला.
आर्या सध्या लंडन येथील बर्ण माउथ युनिव्हर्सिटी मध्ये मार्केटिंग अँड पी.आर. हा अभ्यासक्रम करीत असून ,मागच्या आठवड्यात या अभ्यासक्रमाचे दुसरे वर्ष संपले आहे. तिची एका वर्षात प्लेसमेंट आणि दुसऱ्या वर्षात पदवीपूर्ण होणार आहे.
आर्या ही लंडन स्थित भारतीय विनीत नाईक यांची कन्या, ‘बेळगाव समाचार ‘ या साप्ताहिकाचे संस्थापक कै. प्रभाकर परुळेकर यांची पणती, तसेच भरतेश इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. योगिता पाटील यांची भाची होय. तिने मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.