Tuesday, January 14, 2025

/

आपचा जिल्ह्यात धुव्वा!, सर्वत्र नोटा पेक्षाही कमी मते

 belgaum

मोठ्या हिरीरीने कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या आम आदमी पक्षाचा (आप) मोठा अपेक्षाभंग झाला आहे. कारण या पक्षाच्या उमेदवारांना नोटा मतांपेक्षाही कमी मते मिळाल्यामुळे जिल्ह्यात त्यांचा पार धुव्वा उडाला आहे.

कर्नाटक विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) जिल्ह्यातील 18 पैकी 15 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उभे केले होते. कुडची, यमकनमर्डी व खानापूर हे तीन मतदारसंघ वगळता उर्वरित सर्व मतदार संघातील म्हणजे त्यांच्या 15 उमेदवारांना एकूण फक्त 3,211 मते मिळाली आहेत. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार राजू टोपण्णावर यांनी जोरदार प्रचार केला होता.

मात्र त्यांना केवळ 542 मतांवर समाधान मानावे लागले आहे. बेळगाव उत्तर मध्ये नोटाला 1161 मते मिळाली आहेत. निपाणी मतदारसंघात आप उमेदवाराला 572 मते तर नोटाला 919 मध्ये मिळाले आहेत. त्याचप्रमाणे चिकोडी -सदलगा मतदार संघात आपला 406 तर नोटाला 957 मते पडली आहेत.

अथणीमध्ये देखील तीच परिस्थिती असून तेथील आपच्या उमेदवाराला कमी म्हणजे 292 तर नोटाला 1137 मते मिळाली आहेत. कागवाडमध्ये हे प्रमाण 330 व 985 असे आहे.

जिल्ह्यात आप उमेदवाराच्या तुलनेत सर्वात जास्त मते रायबाग मतदार संघातील त्यांच्या उमेदवाराला मिळाली आहेत. तेथील उमेदवाराने 1057 मते मिळविले असले तरी नोटाला जास्त म्हणजे 1807 मते मिळाली आहेत. हुक्केरी मतदार संघात आपच्या उमेदवाराला सर्वात कमी म्हणजे 189 मते तर तेथे नोटाला 1168 मते मिळाली आहेत. अरभावी व गोकाक मतदार संघात आमच्या उमेदवाराला अनुक्रमे प्रत्येकी 454 व 779 मते मिळाली आहेत. या ठिकाणचे नोटाचे प्रमाण अनुक्रमे प्रत्येकी 930 व 160 मते इतके आहे. बेळगाव दक्षिण व ग्रामीणमध्ये आपच्या उमेदवारांना प्रत्येकी अनुक्रमे 511 व 436 मते मिळाली आहेत.

या दोन मतदारसंघात नोटा मतांचे प्रमाण अनुक्रमे प्रत्येकी 1599 आणि 1165 इतके आहे. कित्तूर मतदारसंघांमध्ये आपला 395 तर नोटाला 802 मते मिळाले आहेत. बैलहोंगल, सौंदत्ती व रामदुर्गमध्ये आपला अनुक्रमे प्रत्येकी 970 1596 आणि 250 मते तर नोटाला अनुक्रमे प्रत्येकी 1319, 596 व 1646 मते मिळाली आहेत

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.