Friday, November 29, 2024

/

जेजेएम अधिकाऱ्यांना येळ्ळूर ग्रा. पं. अध्यक्षांनी धरले धारेवर

 belgaum

येळ्ळूर येथील जलजीवन योजनेअंतर्गत घरोघरी नळ पाणी पुरवठ्याची व्यवस्था सुरळीत नसल्याने येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी गावकऱ्यांचा समक्ष संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून जाब विचाल्याची तसेच पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास आम्ही कोणालाही सोडणार नाही, असा इशारा दिल्याची घटना काल गुरुवारी घडली.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून लोकांना पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे. येळ्ळूर येथील कोटय़वधी खर्चून सुरू झालेली जल जीवन मिशन (जेजेएम) योजनाही धोक्यात आल्याचं चित्र दिसत आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत घरोघरी नळाला सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार येळ्ळूर आणि अवचारहट्टी ग्रामस्थांनी केली आहे.

आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा पाणी येते, ते देखील अल्पकाळासाठी. कांही ठिकाणी तर अनेक घरांच्या नळांना पाणीच येत नसल्याची तक्रार आहे. बांधकाम करताना ठेकेदाराने निष्काळजीपणा केल्याचा आरोपही केला जात आहे.

महात्मा फुले गल्ली व इंदिरानगर या ठिकाणी गेले कित्येक दिवस पाणी आलेलं नसल्याची तक्रार कानावर येताच येळ्ळूर ग्रा. पं अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी त्या ठिकाणी भेट दिली. तसेच पाण्याची समस्या जाणून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारानां बोलावून घेतले. तसेच त्यांना जाब विचारून चांगलेच धारेवर धरले. गावातील सध्याची पाणी समस्या आणि लोकांना पाण्यासाठी करावी लागणारी वणवण, त्यांचे होणारे हाल याकडे तूम्ही कधी लक्ष देणार? असा सवाल अध्यक्ष पाटील यांनी केला. तसेच जर गावात 200 टक्के घरगुती नळ असतील तर त्यातील फक्तं 150 टक्के नळानांच पाणी येत आहे. मग राहिलेल्या 50 टक्के लोकांनी कूठे जावं? याविषयी अनेकवेळा तक्रार करून आणि ही बाब अधिकारी आणि कंत्राटदारांच्या सातत्याने निदर्शनास आणून देखिल अजूनही याबाबत कोणतच ठोस पाऊल का उचलल गेलं नाहीय? असा प्रश्नही सतीश पाटील यांनी अधिकाऱ्याना केला.Yellur gp

पीएचई विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांच्या सुस्त वृत्तीमुळे जेजेएम अभियान धोक्यात आलं आहे. ज्या घरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नळ जोडणी करण्यात आली मात्र पाणीच येत नसेल तर त्याचा काय फायदा. त्यामुळे ग्रामस्थांना घरात नळ असूनही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हे अत्यंत चुकीचं असल्यामूळे लवकरात लवकर प्रत्येक घराघरात टप्प्या टप्प्याने अगदी वेळेत लोकांना पाणी पुरवठा करावा. आमच्या गावाची लोकसंख्या 25000 असून त्यासाठी सरकारने 6 कोटी रुपयांची जल जीवन मिशन योजना आमच्यासाठी मंजूर केली आहे.

मात्र या पद्धतीने जर या योजनेचे थातूरमातूर नियोजन होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा ग्रा. पं. अध्यक्ष सतीश पाटील यांनी संबधीत अधिकाऱ्याना दिला. याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य प्रमोद पाटील, शिवाजी नांदुरकर, रूपा पुण्ण्यान्नवर, दलित संघटनेचे लक्ष्मण छत्र्यान्नवर, प्रमोद सूर्यवंशी, भीमराव पुण्ण्यान्नवर, पीएचई विभाग अधिकारी, कंत्राटदार आणि गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.