बेळगाव जिल्ह्यात काल एकाच दिवसात 19 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आज रविवारी 14 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात कोरोनाचे 33 नवे रुग्ण आढळले आहेत.
रविवारी सर्वाधिक 10 रुग्ण सौंदत्ती तालुक्यात आढळले आहेत. तर बेळगावात 2 आणि चिकोडी तसेच खानापूरात प्रत्येकी एक रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या बेळगाव जिल्ह्यात 36 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत.
आगामी महिन्याभरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार होणार आहे त्यावेळी गर्दीत कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पुन्हा मास्क आणि स्यानीटायझर वापर वाढवावा लागणार आहे.