भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गडकरी, फडणवीस यांचा समावेश

0
5
Fadanwis gadkari
 belgaum

एकीकडे मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समिती महाराष्ट्रातील भाजपा आणि काँग्रेसला पत्र लिहून आपल्या नेतेमंडळींना समितीच्या विरोधात प्रचारासाठी पाठवू नका अशी विनंती करत असताना दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचाही समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवड समितीने काल मंगळवारी जाहीर केलेल्या आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आदी दिग्गजांच्या नावांसह 5 व्या क्रमांकावर केंद्रीय रस्ते महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि 25 व्या क्रमांकावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांव नमूद आहे.

त्यामुळे आगामी दिवसात सीमाभागातील बेळगाव व खानापूर येथील एकूण चार मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रातील भाजपाचे नेते प्रचारात उतरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भारतीय जनता पक्षा व्यतिरिक्त काँग्रेसचे देखील काही नेते बेळगाव सीमा भागात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी येण्याची शक्यता आहे. एकंदर मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीने धाडलेल्या विनंती पत्राला महाराष्ट्रातील विरोधी पक्ष किंवा सर्वपक्षीयांकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.Fadanwis gadkari

 belgaum

भाजपच्या केंद्रीय निवड समितीने जाहीर केलेल्या 40 स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये नरेंद्र मोदी, जगत प्रकाश (जेपी) नड्डा, राजनाथ सिंग, अमित शाह, नितीन गडकरी, बी. एस. येडीयुराप्पा, नवीन कुमार कटील, बसवराज बोम्मई, प्रल्हाद जोशी, डी. व्ही. सदानंदगौडा, के. एस. ईश्वरप्पा, एम. गोविंद कारजोळ, आर. अशोक, निर्मला सीतारामन, स्मृती इराणी, धर्मेंद्र प्रधान, मनसुखभाई मांडवीया,

के. अण्णामलाल, अरुण सिंग, डि. के. अरुणा, सी. टी. रवी, योगी आदित्यनाथ, शिवराजसिंग चौहाण, हेमंत बिश्व शर्मा, देवेंद्र फडणवीस, प्रभाकर कोरे, शोभा करंदलाजे, ए. नारायणस्वामी, भगवंत खुबा, अरविंद लिंबावळी, बी. श्रीरामलू, कोटा श्रीनिवास पुजारी, बसवनगौडा पाटील -यत्नाळ, डॉ. उमेश जाधव, चलवादी नारायणस्वामी, एन. रविकुमार, जी. व्ही. राजेश, जग्गेश, श्रुती आणि तारा अनुराधा यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.