Sunday, November 17, 2024

/

समितीकडून दक्षिणची उमेदवारी मिळवण्यासाठी वल्लभ गुणाजी सज्ज

 belgaum

बेळगाव दक्षिण मतदार संघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला संधी मिळावी अशी मागणी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते वल्लभ गुणाजी यांनी केली आहे.

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आपला अर्ज सादर करून यावेळी निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
वल्लभ गुणाजी हे खानापूर तालुक्यातील नंडगडचे सुपुत्र आहेत. बेळगाव दक्षिण मतदार संघातील चन्नम्मा नगर येथे ते मागील पंधरा वर्षांपासूनचे रहिवासी आहेत.

बेळगाव दक्षिण मतदारसंघातील नागरी समस्या त्यांनी जवळून पाहिल्या आहेत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. ज्यामध्ये गोरगरिबांना मदत, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अन्याय आणि अत्याचारग्रस्तांसाठी आवाज उठवणारा कार्यकर्ता आणि इतर अनेक कार्यांचा समावेश आहे.Vallabh

औषधी वनस्पतींचे उत्पादक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. उद्योजक जगात त्यांनी आपला वेगळा ठसा आणि छाप उमटविली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती ही मराठी माणूस आणि मराठीच्या हितासाठी काम करणारी संघटना असल्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून कर्नाटक विधानसभेत पोहोचण्याचा आपला मनोदय आहे. मराठी भाषिक आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी आपण सातत्याने कार्य करीत राहणार आहोत. अशी माहिती त्यांनी बेळगाव live शी बोलताना दिली.

गुरुवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आपला अर्ज ते सादर करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांना समर्थन देणारे कार्यकर्ते आणि उद्योजक उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती मिळाली आहे.
मानव हक्क आयोगाच्या माध्यमातून ही वल्लभ गुणाजी यांनी मानव हक्क अबाधित राहण्याच्या दृष्टीने विशेष कार्य केले असून या कार्याबद्दल त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. त्यामुळे एका सामाजिक कार्यकर्त्याचा राजकीय प्रवेश चर्चेचा ठरला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.