बेळगाव लाईव्ह : बेळगाव दक्षिण मतदार संघाचा महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार कोण होणार याकडे केवळ बेळगाव किंवा मराठा मंदिर समोर थांबलेल्या हजारो युवकांना नव्हे तर कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील अनेकांचे डोळे लागले होते.
बेळगाव दक्षिण मतदार संघाची उमेदवार निवड प्रक्रिया अत्यंत चुरशीच्या वातवरणात पार पडली शनिवारी सायंकाळी सुरू झालेली प्रक्रिया रात्री संपली आणि अंदाजे रात्री ९वाजता निवड समितीचे अध्यक्ष अनिल आंब्रोळे यांनी रमाकांत कोंडूस्कर हे दक्षिण समितीचे अधिकृत उमेदवार असतील जनमत चाचणीत एकतर्फी 80टक्के मतदान घेऊन त्यांची निवड केल्याचे त्यांनी सांगितले.
निवडीच्या शेवटची पंधरा मिनिटे इच्छुकांची मनधरणी आणि सेन्स जाहीर करताना अनेकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचल्या होत्या.मराठा मंदिर मध्ये सुरु असलेल्या निवड प्रक्रियेला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.सी आर पी एफ च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या विरोधकांचे डोळे या ठिकाणी लागून बसले होते कुणाला मिळणार बेळगाव दक्षिणची उमेदवारी..
बेळगावच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच उमेदवार निवड प्रक्रियेला असा रंग चढला होता मराठा मंदिर परिसरात केवळ पोलिसच नव्हे तर सीआरपीएफ जवान देखील दाखल झाले होते. कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या १८ मतदारसंघात विविध राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून दक्षिण मतदार संघातून निवडणूक लढविण्यास अनेक उमेदवार इच्छुक होते अधिकृत उमेदवार निवडीसाठी निवड कमिटी निर्माण करून जनमत चाचणी द्वारे बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघातील उमेदवार निवडण्यात आले.बेळगाव ग्रामीण आणि उत्तर मतदार संघासाठी निवड समिती आणि जनमत यावर आधारित निकषांवर पारदर्शक पद्धतीने उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र बेळगाव दक्षिण मधील चुरस थोडी अधिकच असल्याने येथील उमेदवार निवडीला थोडा विलंब झाला.
दक्षिणेतील चुरस आणि जमलेली युवकांची हजारोंची गर्दी त्या अनुषंगाने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून केंद्रीय सुरक्षा दलाच्या पोलिसांना पाचारण करण्यात आले होते निवड प्रक्रिया आवाराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सायंकाळी ५ वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली रात्री 9 वाजता निवडीची घोषणा करण्यात आली .पोलीस, सीआरपीएफ जवान आणि शेकडो समर्थक यामुळे या परिसराला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. बेळगावात उमेदवार निवड प्रक्रियेला इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांची हजेरी ही पहिल्यांदाच दिसून आली होती बेळगाव दक्षिणच्या समिती उमेदवार निवडीची चर्चा काही औरच आहे.
निवड होताच फटाक्यांची आतषबाजी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी कोंडूस्कर जमलेल्या हजारो युवकांना मार्गदर्शन करत जेष्ठ समिती नेत्यांचे आणि माघार घेतलेल्या इच्छुकांचे आभार मानले. निवडक समर्थकासह कोंडूस्कर यांनी छत्रपती शिवाजी उद्यान,मराठा समाजाचे देवस्थान जत्ती मठ,शंभो तीर्थ आणि हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाला भेट देत आशीर्वाद घेतले.