बेळगाव लाईव्ह : भाजपमध्ये उमेदवारीवरून अंतर्गत कुरघोड्या सुरु असून अद्याप भाजपने बंडखोरीची शक्यता असल्याने काही उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. मात्र भाजपच्या या सावध खेळीचा भाजपच्याच नेत्यांना घोर लागला आहे.
भाजपाकडे अथणी मतदार संघातून उमेदवारी मागणाऱ्या लक्ष्मण सवदी यांनाही हीच भीती लागून राहिली असून भाजप हायकमांड आपल्यापासून उमेदवारी हिरावून घेईल कि काय या सावटाखाली लक्ष्मण सवदी वावरत आहेत.
उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात भाजपच्या गूढ निर्णयामुळे अखेरच्या क्षणी सवदिंची उमेदवारी नाकारण्यात येईल, अशी दाट शक्यता व्यक्त करण्यात येत असून या पार्श्वभूमीवर सवदी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा जोर धरू लागली आहे.
महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी दिल्यास आपण निवडणूक लढवणार नाही असा पवित्रा माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी घेतला आहे.
मात्र महेश कुमठळ्ळी यांच्याबाजूने आरएसएसच्या नेत्यांनी बॅटिंग केल्याने भाषणे कुमठळ्ळी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.