राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे उद्या शनिवारी आणि रविवारी दोन दिवस सीमाभागातील उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार आहेत.
शनिवारी सायंकाळी रोहित पवार बेळगावात दाखल होणार असून तत्पूर्वी ते निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या साठी सभा घेणार आहेत.
शनिवारी सायंकाळी सात वाजता उत्तर मतदार संघाचे उमेदवार अमर येळळूरकर यांच्यासाठी चव्हाट गल्ली परिसरात सभा घेणार पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
रविवारी सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत बेळगाव ग्रामीण मतदार संघातील उमेदवार आर एम चौगुले यांच्या बेळगुंदी आणि उचगाव जिल्हा पंचायत व्याप्तीतील दुचाकी रॅलीत सहभागी होणार आहेत.
त्यानंतर सायंकाळी पाच वाजता दक्षिण बेळगावचे समिती उमेदवार रमाकांत कोंडूस्कर यांच्या दुचाकी रॅली सहभागी होऊन जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
दरम्यान महाराष्ट्रातून प्रचारक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी बेळगावात दाखल होत आहेत.आगामी काही दिवसांत रोहित पाटील, खासदार संजय राऊत आदी प्रचार सभा घेणार आहेत.