मराठी भाषा, महाराष्ट्र या एका विचाराने अनेक हुतात्म्यांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले आहे. अजूनही त्या हुतात्म्यांचे स्वप्न साकार झालेले नाही. त्यामुळे हे स्वप्न साकार करण्यासाठी मराठी माणसाने लढा दिला पाहिजे. आपला प्रतिनिधी विधिमंडळात पाठवायला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी उचगाव आणि बेळवटी या ठिकाणी झालेल्या कॉर्नर सभेत केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार आर एम चौगुले यांच्या प्रचारार्थ आमदार पवार यांनी दोन ठिकाणी कोपरा सभा घेतल्या.
या सभांमध्ये बोलताना त्यांनी सीमा भागातील मराठी माणूस महाराष्ट्रात येण्यासाठी सातत्याने लढा देत आला आहे. या लढ्यात अनेक जण हुतात्मे झाले केवळ महाराष्ट्रात सामील होणे आणि मराठी भाषेचे रक्षण करणे यासाठी त्यांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे अजूनही त्यांच्या स्वप्न साकार झालेले नाही. त्यामुळे त्यांचा हा विचार कधीही मागे पडणार नाही.
यासाठी सीमा वखातील मराठी भाषिकांनी लढा देणे गरजेचे आहे. युवा वर्गाने आपल्या पूर्वजांनी जो त्या केला तो स्मरून लढत राहिले पाहिजे. आजच्या घडीला कर्नाटक सरकारकडून मराठी भाषेवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केला जात आहे. मराठी बोलणे हा गुन्हा ठरत आहे. मराठी भाषा आणि संस्कृती चिरडण्याचे प्रकार होते होत आहेत. त्यामुळे या सगळ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपला हक्काचा माणूस विधिमंडळात असणे आवश्यक आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनी महाराष्ट्र के कारण समितीच्या पाठीशी थांबावे. आर. एम. चौगुले यांना मतदान करून विजयी करावे आणि कर्नाटकाला सीमा वासियांची लोकेच्छा काय आहे, हे दाखवून द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार मनोहर किनेकर यांनीही मनोगत व्यक्त करून आर्यन चौगुले यांना विजयी करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी उचगाव आणि बेळवटी येथे गावात प्रचार फेरी करण्यात आली. उचगाव येथे हुतात्मा परशुराम लाळगे यांच्या प्रतिमेला अर्पण करण्यात आला.
उमेदवार आर. एम. चौगुले, समितीने ते आर. आय. पाटील, शिवाजी सुंठकर, युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, चेतन पाटील, ॲड. सुधीर चव्हाण, सरस्वती पाटील, अंकुश पाटील किसन लाळगे, डी. बी. पाटील आदी उपस्थित होते.
हुतात्मा स्मारकात अभिवादन
आमदार रोहित पवार यांनी सकाळी हिंडलगा हुतात्मा स्मारकात अभिवादन केले. त्यानंतर बेळगुंदी येथील हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या.