बेळगाव लाईव्ह : कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक वाढली असून कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
बेळगाव एपीएमसीत महाराष्ट्रातून सुमारे १०० हुन अधिक गाड्या दाखल झाल्या असून २०० रुपये ते १००० रुपये प्रति क्विंटल अशा दराने कांद्याची विक्री सुरु आहे.
कांद्याची आवक वाढल्याने कांदा दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून कांदा खरेदीला म्हणावा तितका ग्राहकांचा प्रतिसाद लाभलेला दिसून आला नाही.
नगर, सोलापूर कांदा प्रतिक्विंटल १००० ते १२००, निपाणी गोळा कांदा १२०० ते १३०० प्रतिक्विंटल, मुक्कल कांदा ८०० ते १००० प्रतिक्विटंल, जोड कांदा २०० ते ५०० प्रतिक्विंटल, विजापूर/गुलबर्गा येथील उत्तम प्रतीचा कांदा ९०० ते १००० प्रतिक्विंटल असे कांद्याचे दर आहेत.