Saturday, November 23, 2024

/

जुने बेळगाववासियांचा कोंडुसकरांच्या नावाला पाठिंबा

 belgaum

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव दक्षिण मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून रमाकांत कोंडुसकर यांची निवड केली जावी अशी जोरदार मागणी जुने बेळगाव येथील समस्त नागरिक आणि युवा कार्यकर्त्यांनी केली असून कोंडुसकर यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निवड समितीकडून बेळगाव दक्षिण मतदार संघातील उमेदवार निवडीसाठी मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाली असून काल सायंकाळपासून विविध भागात फिरून जनमत चांचणी घेण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने जुने बेळगाव येथे घेण्यात आलेल्या जनमत चांचणी प्रसंगी तेथील समस्त नागरिकांनी समितीचे धडाडीचे युवानेते रमाकांत कोंडुसकर यांना संपूर्ण पाठिंबा व्यक्त करत त्यांची अधिकृत उमेदवार म्हणून निवड केली जावी अशी मागणी केली आहे. जुने बेळगाव येथील नागरिक आणि युवा वर्गाने तशा आशयाचे विनंती पत्र महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी नगरसेवक नेताजी जाधव यांच्याकडे सादर केले आहे.

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीला आणि सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन आहे की सर्वांनी एकनिष्ठ राहून बंडखोरी न करता एकच उमेदवार द्यावा ही विनंती. आतापर्यंत आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी काम केलं असून यापुढेही करत राहणार आहोत.Old bgm residence

समितीच्या उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. यावेळी कोणालाही उमेदवारी देऊन चालणार नाही. आम्ही कोणाला विरोध करत नाही आहोत आम्हाला जिंकायचे आहे. यासाठी ठाम उमेदवार देणे गरजेचे आहे. आता दक्षिण जिंकायचे आहे. यासाठी सध्या दक्षिण मतदार संघात एकच आवाज घुमत आहे तो म्हणजे बेळगावचा वाघ रमाकांत दादा कोंडुसकर. तेंव्हा समितीची उमेदवारी त्यांनाच द्यावी ही कळकळीची विनंती, अशा आशयाचा तपशील जुने बेळगाव येथील नागरिकांच्या विनंती पत्रात नमूद आहे.

दरम्यान, काल मुलाखतीनंतर दक्षिण मतदार संघात समितीचे 8 पैकी 6 इच्छुक उमेदवार निवडीच्या रिंगणात शिल्लक असून त्यातून एकाची निवड केली जाणार आहे. उद्या शुक्रवारी ही उमेदवार निवड प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.