सार्वत्रिक निवडणुकीसाठी तुमच्या मतदारसंघात उभे असलेल्या उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराबाबत तुम्ही समाधानी नसाल सर्व उमेदवार पात्रतेचे नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर काळजी करण्याची गरज नाही कारण 2023 पासून भारतीय निवडणूक आयोगाने त्यासाठी नोटा अथवा ‘वरीलपैकी कोणी नाही’ (नन ऑफ द अ ॲबाव्ह) हा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.
नोटा बद्दल अनभिज्ञ असाल तर त्याची माहिती पुढील प्रमाणे आहे. नोटा (NOTA) म्हणजे ‘वरीलपैकी कोणी नाही’ (NONE OF THE ABOVE) या इंग्रजी शब्द समूहाचे संक्षिप्त रूप होय.
एखाद्या विशिष्ट निवडणुकीत पात्र मतदारातर्फे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरून मतदान करतांना हा पर्याय वापरण्याची भारतात मुभा आहे. यंत्रावर दर्शविलेल्या यादीतील उमेदवारांपैकी, कोणत्याही उमेदवाराला मत द्यावयाचे नसल्यास ‘वरीलपैकी कोणीही नाही’ हा पर्याय वापरण्यासाठी या बटणाचा उपयोग केला जातो. हे बटन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात उमेदवारांचे यादीचे सर्वात शेवटी असते. 1990 च्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरण्यात येऊ लागले. मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य झाल्या. ईव्हीएम मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर वरील पैकी कोणी नाही ‘नोटा’ हा पर्याय देता येणे मतदारांना शक्य झाले. जर ‘नोटा’ हा पर्याय निवडलेल्या मतदारांची संख्या ही अधिक असेल तर ती निवडणूक रद्द होते व निवडणूक पुन्हा घेण्यात येते.
भारतात सप्टेंबर 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक मतदाराला नोटा अर्थात वरीलपैकी कोणी नाही हा पर्याय अवलंबण्याचे अधिकार बहाल केले. तेंव्हापासून खऱ्या अर्थाने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये हा पर्याय समाविष्ट करण्यात आला. असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, नोटाला निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना फेटाळण्याचा अधिकार नाही.
परंतु त्याऐवजी प्रतिकूल मत नोंदविण्याचा अधिकार आहे. “संमतीसाठी निवडणुकीत संमती रोखून ठेवण्याची क्षमता आवश्यक आहे” या तत्त्वावर हा पर्याय आधारित आहे.
गेल्या 2018 मधील विधानसभा निवडणुकीमध्ये बेळगावच्या विधानसभा मतदार संघांमधील नोटा पर्याय वापराचा तपशील अनुक्रमे मतदार संघ, वैध मते, नोटा मते आणि टक्केवारी यानुसार पुढील प्रमाणे आहे. निपाणी :172251, 1447, 0.84. चिकोडी 179201 1363 0.76 कागवाड :145735, 754, 0.52. कुडची :136653, 348, 0.25. रायबाग :150399, 1184, 0.79. हुक्केरी :157887, 1830, 1.16. अरभावी :176936, 1398, 0.79. गोकाक :173980, 2121, 1.22. यमकनमर्डी :149532, 1702, 1.14. बेळगाव उत्तर :147426, 1361, 0.92. बेळगाव दक्षिण :146715, 1474, 1.00. बेळगाव ग्रामीण :186419, 1958, 1.05. खानापूर :154219, 1561, 1.01. कित्तूर :148512, 1456, 0.98. बैलहोंगल :144800, 1352, 0.93. सौंदत्ती -यल्लमा :153707, 960, 0.62. रामदुर्ग :151328, 1704, 1.13.
नोटा मतं मोजली जातात का? याचे स्पष्टीकरण देताना निवडणूक आयोगाने नोटा हा पर्याय स्वीकारून टाकलेले मत मोजले जात असले तरी ते ‘अवैध मत’ म्हणून गृहीत धरले जाते. त्यामुळे नोटा पर्याय अवलंबून केलेल्या मतदानाचा निवडणुकीच्या निकालावर कोणताही परिणाम होत नाही. निवडणूक निकालावर परिणाम होत नसेल तर नोटाचा उपयोग काय? या प्रश्नाचे उत्तर हे आहे की, नागरिक जर निवडणूक रिंगणातील उमेदवारांबाबत असमाधानी असतील तर त्यांना तशी नापसंती व्यक्त करण्याची संधी नोटामुळे उपलब्ध होते. यामुळे उमेदवाराला आपला पाठिंबा नसतानाही जास्तीत जास्त लोक मतदान करण्याची शक्यता वाढते आणि बोगस मतदानाचे प्रमाण कमी होण्यासही मदत मिळते. भारताचे मुख्य न्यायाधीश पी. सथाशिवम यांनी नकारात्मक मतदानामुळे निवडणुकांमध्ये एक पद्धतशीर बदल घडवून येईल आणि राजकीय पक्षांना देखील नाईलाजाने चांगला स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार द्यावा लागेल असे म्हंटले आहे.