Monday, December 30, 2024

/

राज्यात एकूण 3,633 उमेदवारी अर्ज दाखल झाले

 belgaum

विधानसभेच्या येत्या 10 मे रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक अर्ज भरण्याच्या गेल्या शेवटच्या दिवसाखेर राज्यभरात एकूण 3,633 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आता येत्या सोमवारी उमेदवारी अर्ज माघारी नंतर राज्यातील निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत गेल्या गुरुवारी संपल्यानंतर 20 दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. राज्यात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 3633 उमेदवारांपैकी 3328 पुरुष आणि 304 महिला उमेदवार आहेत. यापैकी भाजपकडून 706, काँग्रेस 651, निजद 455, आप 373, बसप 179 आणि सीपीएम कडून 5 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

त्याचप्रमाणे इतर पक्षांच्या उमेदवारांनी 1008 तर अपक्षाने 1720 अर्ज दाखल केले आहेत. भारतीय जनता पक्षाने राज्यातील सर्व 224 मतदार संघासाठी आपले उमेदवार उभे केले आहेत.

काँग्रेसने मेलुकोटमध्ये सर्वोदय पक्षाच्या दर्शन पुट्टनय्या यांना पाठिंबा देत उर्वरित 223 मतदारसंघासाठी आपले उमेदवार केले आहेत. तर निजदने 200 हून अधिक मतदार संघातील उमेदवारांना बी फॉर्म देखील जारी केले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.