बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांची संख्या वाढली असून या नाराज उमेदवारांचे मन परिवर्तन करून त्यांना निधर्मी जनता दलामध्ये सामील करून घेण्याच्या उद्देशाने निजद नेते माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आज मंगळवारी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत.
माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी आज मंगळवारी सकाळी प्रथम सौंदत्ती यल्लमा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार चोप्रा यांची भेट घेऊन त्यांना निधर्मी जनता दलात सामील करून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कळते. कित्तूर मतदार संघामध्ये डी. बी. इनामदार यांना यावेळी काँग्रेसने आपले तिकीट दिलेले नाही.
त्यामुळे नाराज इनामदार यांच्या स्नुषा लक्ष्मी इनामदार, निपाणीचे उत्तम पाटील आदी काँग्रेसने उमेदवारी नाकारलेले अनेक उमेदवार सध्या बंडाच्या पवित्र्यात आहेत.
या बंडखोर उमेदवारांची भेट घेऊन एच. डी. कुमारस्वामी त्या सर्वांना निधर्मी जनता दलात सामील होण्याचे निमंत्रण देणार असल्याचे समजते.