Tuesday, December 24, 2024

/

शहरात ख्रिश्चन बांधवांकडून गुड फ्रायडे गांभीर्याने

 belgaum

बेळगाव शहरातील ख्रिश्चन धर्मियांतर्फे काल शुक्रवारी गुड फ्रायडे विशेष प्रार्थनेसह विविध कार्यक्रमांद्वारे गांभीर्याने आचरणात आणण्यात आला.

प्रभू येशूंना क्रुसावर चढविलेला दिवस म्हणजे ‘गुड फ्रायडे’ होय. वास्तविक हा ख्रिश्चन धर्मियांसाठी दुःखद दिन असला तरी तो गुड फ्रायडे म्हणून ओळखला जातो. मानव जातीचे कल्याण आणि उद्धारासाठी येशुंनी आत्म बलिदान स्वीकारले म्हणूनच हा दिवस आचरणात आणला जातो.

या दिवशी समस्त ख्रिश्चन बांधव कडकडीत उपवास करून येशूचे स्मरण करतात. गुड फ्रायडे निमित्त कॅम्प येथील फातिमा कॅथेड्रल चर्च, सेंट अँथनी चर्च, शहापुरातील माउंट मेरी चर्च, कोर्ट रोडवरील मेथोडेस्ट चर्च, एपीएमसी जवळील चर्च , गणेशपुर येथील चर्च आदी विविध ठिकाणी असलेल्या ख्रिश्चन प्रार्थनास्थळी काल शुक्रवारी विशेष प्रार्थना झाली. त्याचप्रमाणे पवित्र बायबलचे वाचन देखील झाले.Good friday

शहर उपनगरातील चर्चच्या ठिकाणी झालेल्या सदर कार्यक्रमास एकूणच शेकडो ख्रिश्चन धर्मियांनी हजेरी लावली होती. येशूचा शुक्रवारी क्रुसावर झालेला मृत्यू व तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी झालेला पुनर्जन्म यामुळे मानवाला पाप मुक्ती व सर्वकालीन जीवन प्राप्त होते.

पुनर्जन्म झालेला रविवार हा ईस्टर संडे म्हणून आचरणात येतो. त्या दिवसानंतर येशुनी शिष्यांची भेट घेऊन 40 व्या दिवशी स्वर्गारोहण केले अशी ख्रिश्चन धर्मियांची धारणा आहे.

त्यानुसार आता उद्या रविवार दि. 9 एप्रिल रोजी ‘ईस्टर संडे’चे आचरणही केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.