विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज मंगळवारी तिसऱ्या दिवशी बेळगाव जिल्ह्यात एकूण 76 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. हे अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये 68 पुरुष आणि 8 महिला उमेदवारांचा समावेश आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कागवाड आणि यमकणमर्डी एसटी हे विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य सर्व मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले. मतदार संघ निहाय त्याचा तपशील थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
निपाणी : आप -2, निजद -1, नोंदणीकृत अपरिचित पक्ष (आरयुपी) -2, स्वतंत्र -1, एकूण -6 (5 पुरुष 1 महिला). चिक्कोडी -सदलगा : भाजप -3, आप -1, आरयुपी -1, स्वतंत्र -1, एकूण -6 (सर्व पुरुष). अथणी : काँग्रेस -2, निजद -1, आरयुपी -1,
स्वतंत्र -1, एकूण -5 (सर्व पुरुष). कुडची एससी : भाजप -1, आरयुपी -1, एकूण -2 (1 पुरुष 1 महिला). रायबाग एससी : भाजप -2, स्वतंत्र -1, एकूण -3 (सर्व पुरुष). हुक्केरी : भाजप -4, काँग्रेस -8, एकूण -12 (सर्व पुरुष). अरभावी : आप -1, आरयुपी -1, स्वतंत्र -1 एकूण -3 (सर्व पुरुष). गोकाक : भाजप -4, काँग्रेस -1, आप -1, निजद -1, स्वतंत्र -1, एकूण -8 (सर्व पुरुष).
बेळगाव उत्तर : आप -1, आरयुपी -1, स्वतंत्र -1, एकूण -3 (सर्व पुरुष). बेळगाव दक्षिण : आप -1, आरयुपी -1, स्वतंत्र -2, एकूण -4 (सर्व पुरुष). बेळगाव ग्रामीण : काँग्रेस -4, एकूण -4 (सर्व महिला. खानापूर : भाजप -2, काँग्रेस -1, स्वतंत्र -1, एकूण -4 (3 पुरुष 1 महिला). कित्तूर : आप -1, आरयुपी -1, एकूण -2 (सर्व पुरुष).
बैलहोंगल : भाजप -2, आरयुपी -2, स्वतंत्र -1, एकूण -5 (सर्व पुरुष). सौंदत्ती -यल्लमा : भाजप -1, आप -1, निजद -1, आरयुपी -1, स्वतंत्र -1, एकूण -5 (4 पुरुष 1 महिला). रामदुर्ग : भाजप -1, काँग्रेस -1, आप -1, स्वतंत्र -1, एकूण -4 (सर्व पुरुष). या पद्धतीने आज मंगळवारी दिवसभरात एकूण 76 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत यामध्ये 68 पुरुष आणि 8 महिला उमेदवारांचा समावेश आहे.