Sunday, December 1, 2024

/

भाजपच्या उमेदवारीत फडणवीसांची भूमिका?

 belgaum

 

विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यातील भाजपच्या तिकिटासाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू असताना बहुतांश नेते दिल्लीत लॉबिंग करत आहेत काँग्रेसचे दोन उमेदवारी याद्या जाहीर केल्या असल्या तरी भाजपने अद्याप पहिली यादी जाहीर केलेली नाही.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी पहिली यादी जाहीर होऊ शकते दिल्लीत सध्या केंद्रीय निवडणूक कमिटीच्या बैठकांचे सत्र सुरू असून इच्छुक असलेल्या विद्यमान खासदार आणि विधान परिषद सदस्यांना उमेदवारी देण्यात यावी का नाही? यावर चर्चा सुरू असून त्यानंतर विद्यमान आमदारा बाबत निर्णय होऊ शकतो.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बेळगाव जिल्ह्यातील भाजपच्या तिकीट वाटपात महत्वाची भूमिका निभावू शकतात.फडणवीस हे केंद्रीय निवडणूक समितीत आहेत. या शिवाय बेळगाव जिल्ह्यातील बहुतांश इच्छुक उमेदवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आहे.

फडणवीस यांच्या माध्यमातूनच रमेश जारकिहोळी हे कर्नाटकात भाजपचे सरकार आणण्यात यशस्वी झाले होते. भाजपने रमेश जारकिहोळी यांना न दुखवता फडणवीस यांच्या मध्यस्थितून उमेदवार यादी काढण्याची तयारी चालवली असल्याची शक्यता आहे.

आगामी विधान सभेसाठी बेळगाव जिल्हा उमेदवार निवडी वरून भाजपसाठी डोकेदुखी ठरला आहे. भाजपचे सरकार आणण्यात किंग मेकर ठरलेले रमेश जारकिहोळी यांनी चार मतदार संघात आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी यासाठी हट्ट धरला आहे त्यामुळे भाजपची यादी रखडली आहे यावर तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करू शकतात आणि त्या नंतर म्हणजे 10एप्रिल नंतर भाजपची पहिली यादी बाहेर येऊ शकते.

भाजपच्या 224 पैकी40 मतदार संघात चार हून अधिक जन इच्छुक आहेत त्यात हे मतदार संघ भाजपसाठी डोके दुखी ठरले आहेत.

अथनी मधून महेश कुमटहळळी, कागवाड मधून श्रीमंत पाटील तर बेळगाव ग्रामीण मधून नागेश मननोळकर यांना तिकीट मिळवून देण्यासाठी लॉबिंग केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.