कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील कोगनोळी चेकपोस्टच्या ठिकाणी काल शुक्रवारी रात्री एका खाजगी बसमधून 7 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार कोगनोळी चेकपोस्टच्या ठिकाणी काल शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून चिक्कमंगळूरकडे जाणाऱ्या गणेश ट्रॅव्हल्स ही खाजगी बस अडविण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि नियुक्त विशेष पथकाने बसची झडती घेतली असता बसमधील प्रवासी एम. एन. उदयशंकर यांच्याकडे 7 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम आढळून आली.
सदर रकमेबद्दल उदयशंकर यांना योग्य स्पष्टीकरण देताना न आल्यामुळे तसेच त्या रोकड रकमेसंदर्भातील कागदपत्रे देखील नसल्यामुळे ती रक्कम जप्त करण्यात आली.
निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, उपनिरीक्षक कृष्णा नाईक, उपनिरीक्षक रेवण्णा गुरीकार, शिवानंद चिकमट, शिवप्रसाद किवडनावर, अमर चंदनशिव, संदीप गाडीवड्डर आदी कारवाईप्रसंगी उपस्थित होते.