बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर यांना जायंट्स भूमिपुत्र पुरस्कार जाहीर झाला असून हा पुरस्कार २ एप्रिल रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजिण्यात आला आहे.
कट्टनभावी, निंगेनहट्टी, गुरामहट्टी कडोली आदी ग्रामीण भागात दोन लाख झाडांची लागवड, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, तलाव , विहिरी व बंधाऱ्याची निर्मिती करून जमीन ओलिताखाली आणणे, मनुष्यासह पशुपक्षांनाही सुखावणारे, नरेगा या योजनेमधून सर्वांना काम मिळवुन दिलेलं आहे.
यासोबतच निरक्षरासाठी प्रौढ शिक्षण तसेच अरण्य भागात मुलामुलींसाठी शिक्षण सुरू करणारे डॉ. शिवाजी कागणीकर यांच्या आदर्श आणि प्रेरणादायी कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार प्रदान सोहळा रविवार दि ०२ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे असे सुनिल मुतगेकर आणि लक्ष्मण शिंदे यांनी कळविले आहे.