Sunday, November 24, 2024

/

‘ग्रामीण’मध्ये काँग्रेसने रोखली होती भाजपची विजयी घोडदौड

 belgaum

कर्नाटक विधानसभेच्या गेल्या 2008, 2013 आणि 2018 सालच्या निवडणुकांमध्ये बेळगाव उत्तरच्या परस्पर विरोधी चित्र बेळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये पहावयास मिळाले. दोन निवडणुकांमधील या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाची मक्तेदारी मोडीत काढून गत वेळी काँग्रेसने बेळगाव ग्रामीण मतदारसंघावर वर्चस्व मिळविले आहे.

मागील 2008 साली झालेल्या बेळगाव ग्रामीण मतदार संघातून एकूण 10 उमेदवारांनी कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवली. या सर्व उमेदवारांसाठी 71.11 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे संजय पाटील सर्वाधिक 31.73 टक्के मते मिळवून विजयी झाले. त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार एस. सी. माळगी यांच्यावर 6.25 टक्के इतक्या मत फरकाने मात केली. काँग्रेसच्या माळगी यांना 25.48 टक्के मते मिळाली होती.Bgm rural

विधानसभेच्या 2013 सालच्या निवडणुकीत ग्रामीण मतदार संघामध्ये एकूण 12 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणुकीसाठी 74 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत भाजपचे संजय पाटील आणि स्वतंत्र (म. ए. समिती) उमेदवार मनोहर किणेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. मात्र संजय पाटील यांनी 0.88 टक्के मतांनी किणेकर यांच्यावर निसटता विजय मिळविला. निवडणुकीत संजय पाटील यांना 25.2 टक्के इतकी मते मिळाली तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी मनोहर किणेकर यांना 24.32 टक्के मते पडली. अशाप्रकारे संजय पाटील या मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले होते.

संजय पाटील यांची ही विजयी घोडदौड 2018 सालच्या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रोखली. विधानसभेच्या 2018 मधील निवडणुकीमध्ये बेळगाव ग्रामीण मतदार संघात एकूण 13 उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीला चांगला प्रतिसाद देताना त्यावेळी 77.55 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी तब्बल 54.74 टक्के मते मिळवून काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी निर्विवाद विजय संपादन केला.

त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी भाजपच्या संजय पाटील यांचे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकून ‘हॅटट्रिक’ साधण्याचे स्वप्नभंग करताना त्यांचा 27.75 टक्के इतक्या मत फरकाने पराभव केला. या निवडणुकीत संजय पाटील यांना 26.99 टक्के मते मिळवता आली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.