आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव शहर उत्तर आणि दक्षिण मतदार संघाचा उमेदवार निवडी संदर्भात रविवारी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे
मध्यवर्ती म ए समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या घटक समित्यांनी आपापल्या विधानसभा क्षेत्रातील उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्या
चे आदेश दिले आहेत.
उमेदवार निवडण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे होण्यासाठी मतदार,कार्यकर्ते पदाधिकारी, सभासद,युवक मंडळे व महिला मंडळे यांनी सहकार्य करावे. उमेदवार निवडण्याची पद्धती कशी असावी याबाबत चर्चा केली जाणार आहे.
रविवार दिनांक 2 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3:30वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बैठक बोलावण्यात आली आहे .सर्वांनी वेळेवर हजर राहावे असे आवाहन अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.