आगामी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून बेळगाव उत्तर संघाची उमेदवारी आसिफ उर्फ राजू शेठ यांना तर दक्षिण मतदारसंघाची उमेदवारी प्रभावती मास्तमर्डी चावडी यांना जाहीर करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी 43 मतदार संघातील उमेदवारांची यादी शनिवारी दुपारी जाहीर केली.
बेळगाव जिल्ह्यातील अथणी मतदारसंघातून नुकताच भाजप सोडून काँग्रेसचे झालेल्या लक्ष्मण सवदी यांना देण्यात आली आहे तर रायबाग या अनुसूचित जातीच्या आरक्षित मतदार संघात महावीर मोहित आणि अरभावी मधून अरविंद दलवाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बेळगाव दक्षिण मतदार संघातून विणकर समाजाला तर उत्तर मधून मुस्लिम समाजाला काँग्रेसने उमेदवारी देऊ केली आहे.