बेळगाव लाईव्ह : काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार म्हणून उत्तर मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले अजीम पटवेगार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज परत घेत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजू सेठ यांना पाठिंबा दिला आहे.
काँग्रेसने उत्तर मतदार संघात जाहीर केलेल्या उमेदवारीमुळे नाराज झालेल्या अजीम पटवेगार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. एकाच पक्षातील दोन उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे काँग्रेस वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी समजूत काढली असून ज्या काही समस्या असतील त्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर पटवेगार यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे.
काँग्रेसने उत्तर मतदार संघात प्रबळ उमेदवार दिला असून केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आणि युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आपण आपला उमेदवारी अर्ज परत घेत असल्याचे अजीम पटवेगार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.
यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस प्रदीप एम जे. नगरसेवक बाबाजान मतवाले, रियाज किल्लेदार, नासिर पठाण, नजीर पटवेगार, ऐजाज हकीम आदी उपस्थित होते.