बेळगाव लाईव्ह एक्सलूझीव: बेळगाव उत्तर मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी आज ‘बेळगाव लाईव्ह’ ने मुलाखत घेतली. यावेळी बोलताना अमर येळ्ळूरकर यांनी राष्ट्रीय पक्षांच्या मराठा समाजातील काटकारस्थानाबद्दल टीका केली.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी बेळगावमधील मराठा समाजातील नेत्यांना डावलले. यामुळे बेळगाव आणि मराठी भाषिक असे बेळगावचे समीकरण आहे. मात्र तरीही जाणीवपूर्वक मराठा समाजावर अन्याय करण्यात आला. बेळगाव शहराची माध्यम भाषा हि मराठी आहे. मात्र तरीही उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदार संघात केवळ मराठा उमेदवार म्हणून अनिल बेनके आणि किरण जाधव यांना डावलले. मराठी भाषिकांना मराठी भाषेपासून तोडण्याचा हा कुटील डाव राष्ट्रीय पक्षांनी आखला.
हे दोन्ही मतदार संघ मराठी भाषिकांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जातात. मात्र भाजपसह काँग्रेसनेही या भागात मराठी भाषिकांना डावलण्याचे कटकारस्थान आखले. आता बेळगावची प्रत्येक भाषिक जनता सजग झाली असून आपले प्रतिनिधित्व केवळ मराठी भाषिक उमेदवारच करू शकतात हि बाब हेरून चारही मतदार संघात समितीचेच उमेदवार निवडून देण्यासाठी सज्ज झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गेल्या काही वर्षात राष्ट्रीय पक्षांच्या मागे बेळगावमधील जनता धावत होती. मात्र त्या पक्षांकडून कोणत्याही जाती-धर्माच्या-भाषेच्या नागरिकांसाठी काम केले गेले नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून सलोखा निर्माण होत होता. मात्र राष्ट्रीय पक्षांच्या वल्यामुळे एकत्र राहून अन्यायाविरोधात लढायची चळवळ थांबली होती. आता जनतेला आणि प्रामुख्याने युवकांना साक्षात्कार झाला असून पुन्हा एकदा निवडणुकीच्या माध्यमातून सर्वांच्या प्रयत्नातून हि चळवळ उभी राहात आहे. मराठी भाषिकांसह सर्वच भाषिकांनी राष्ट्रीय पक्षांच्या मागे न धावता समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभारण्याचा निर्धार केल्या असल्याचा विश्वास अमर येळ्ळूरकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र एकीकरण समितीशी आपली जन्मापासूनची नाळ आहे. मागील महानगरपालिका निवडणुकीत शशिकला जोल्ले यांनी जाणीवपूर्वक मला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी डाव रचला. सरकारी शाळा क्रमांक ५ चा बिरशैव सोसायटीसाठी व्यवहार करण्यात येत होता. सदर व्यवहार थांबवून आपण सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती आणली. याचाच भाग म्हणून शशिकला जोल्ले यांनी इतर समाजाची दिशाभूल करून माझा पराभव केल्याचा आरोपही अमर येळ्ळूरकर यांनी केला.