गुढीपाडव्याच्या निमित्ताने आज सकाळी शहरातील अशोकनगर येथील बागायत खात्याच्या होलसेल फुल मार्केटमध्ये फुलांच्या खरेदी – विक्रीसाठी शहर आणि जिल्ह्यातील ग्राहक आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे एकच गर्दी उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 शेजारी असलेल्या अशोकनगर येथील होलसेल फुल मार्केटमध्ये सणासुदीला फुलांचा मोठ्या प्रमाणात व्यापार होत असतो. जिल्ह्यातील विविध गावांसह जिल्ह्याबाहेरील परगावाहून या ठिकाणी फुलांची मोठी आवक होत असते.
. गुढीपाडव्यानिमित्त आज पहाटेपासून या मार्केटमध्ये फुले खरेदी -विक्रीचा व्यवहार सुरू होता. त्यामुळे या ठिकाणी एकच गर्दी होऊन फुल मार्केटला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
पाडव्यानिमित्त आज या मार्केटमध्ये फुलांचे दर पुढील प्रमाणे होते. गलाटा 120 ते 150 रु., शेवंती 250 ते 350 रु., गुलाब 250 ते 380 रु., केशरी झेंडू 80 ते120 रु., पिवळा झेंडू 60 ते 100 रुपये.