चोरीला गेलेला तुमचा स्मार्टफोन असो किंवा मोबाईल फोन तो ब्लॉक करण्यासाठी आता तुम्हाला अधिकृत सरकारी पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून ज्याचे नांव सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर अथवा कार पोर्टल असे आहे.
बेळगावामध्ये कार पोर्टलच्या सहाय्याने आतापर्यंत चोरीला गेलेले आणि हरवलेले असे एकूण 18 मोबाईल फोन सापडले असून ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. आपला मोबाईल चोरीला गेला, हरवला किंवा एखाद्याने हिसकावून पळवला तर नागरिकांनी सदर पोर्टलच्या माध्यमातून जवळच्या केएसपी (ई-लास्ट) अर्जाद्वारे तक्रार नोंदवायची आहे. नागरिकांनी कार पोर्टल सुविधेचा योग्य प्रकारे वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिवसेंदिवस मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत आहे, चोरीला गेलेल्या मोबाईलच्या गैरवापराचीही अनेकांना भिती वाटते. मात्र, हाच सगळा प्रकार टाळण्यासाठी आता सरकारनेच नवी उपाययोजना केली आहे. आता तुमचा मोबाईल चोरीला गेला तरी सुद्धा तो कुणीही वापरू शकणार नाही. देशात मोबाईल चोरींच्या घटनांचा आकडा मोठा आहे, यालाच कांही प्रमाणात चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने सेंट्रल इक्वीपमेंट आयडेंटीटी रजिस्टर म्हणजे ‘सीईआयआर’ ही नवी वेबसाईट सुरू केली आहे.
जर तुमचा मोबाईल चोरी गेला, तर त्याचा आयएमईआय नंबर तुम्हाला या वेबसाईटवर रजिस्टर करायचा आहे. त्याद्वारे तुमचा मोबाईल डिव्हाईस तातडीनं ब्लॉक करण्याची सुविधा आहे. तुमचा फोन ब्लॉक केल्याची माहिती देशातील सर्व मोबाईल कंपन्यांना दिली जाणार असून सोबतच पोलिसांना मोबाईल ट्रँकही करता येणार आहे. चोरी गेलेला वा हरवलेल्या मोबाईलमध्ये कुणी दुसरं सीमकार्ड टाकलं तर तातडीनं याची माहिती तक्रार केलेल्या पोलिस ठाण्यात मिळेल आणि चोर पकडला जाईल.
चोरीला गेलेला अथवा हरवलेला तुमचा मोबाईल फोन आता तुम्ही कार पोर्टलव्दारे 3 सोप्या टप्प्यांमध्ये ब्लॉक करू शकता. ज्याचा पुढे आपल्याला मोबाईलचा माग काढण्यासाठी आणि पुनर्प्राप्तीसाठी उपयोग होतो. तुम्ही जर कर्नाटकातील असाल तर हरवलेल्या अथवा चोरीला गेलेल्या मोबाईलची माहिती देण्यासाठी पुढील कृती करा. प्रथम https://kspapp.in/ksp/api/elost-reports या ठिकाणी जा. त्यानंतर एफआयआरची डिजिटल पोचपावती घ्या. तुम्हाला मोबाईल सेवा देणाऱ्याकडून डुप्लिकेट सिम घ्या. त्यानंतर कार पोर्टलला जा. https://www.ceir.gov.in/Request/CeirUserBlockRequestDirect.jsp