माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आज रविवारी सकाळी सकाळीच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची आदर्शनगर, हुबळी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन जवळपास एक तास त्यांच्या समवेत चर्चा केली.
आगामी विधानसभा निवडणूक व्यवस्थापना संदर्भात भाजप कोर कमिटीची आज बैठक होणार असून त्यामध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी थेट घरापर्यंत जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे हा एक कुतूहलाचा विषय झाला आहे. तथापि जानकीहोळी यांची ही भेट अथणी विधानसभा मतदारसंघातून आपले मित्र महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी मिळावी यासाठी असल्याची दाट शक्यता जाणकारांमध्ये व्यक्त होत आहे.