Wednesday, December 25, 2024

/

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय धर्माचार्य भगवानगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला अभिवादन करून, श्रीरामाचे पूजन करून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला.

राणी कित्तूर चन्नम्मा चौकापासून सुरु झालेली हि शोभायात्रा हत्ती, घोडे, बैलगाड्या, पालखी, भजनी मंडळांचा ठेका, ढोलताशांचा गजर, देखावे यासह श्रीराम भक्त हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, संत बसवेश्वर महाराज आदी महापुरुषांच्या मूर्तींचे चित्ररथ यासह श्रीराम भक्तांच्या अमाप उत्साहात हि शोभायात्रा कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक, रामलिंगखिंड गल्ली मार्गे टिळक चौकापर्यंत जल्लोषात पार पडली.

यावेळी बोलताना राष्ट्रीय धर्माचार्य भगवानगिरी महाराजांनी सर्वधर्मसमभाव जपून आजच्या तरुण पिढीने प्रभू श्रीरामचंद्राचे विचार आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले. आज तरुणांमध्ये जी अराजकता निर्माण झाली आहे यावर निर्बंध घालायचे असल्यास आणि तरुणांचे भविष्य उज्वल करायचे असल्यास श्रीरामांचे विचार त्यांच्या मनावर बिंबविणे गरजेचे असल्याचे भगवानगिरी महाराज म्हणाले.Ram sena

यावेळी श्रीरामसेना हिंदुस्थानचे संस्थापक रमाकांत कोंडुसकर म्हणाले, दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम नवमीनिमित्त बेळगावमध्ये शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू श्रीरामचंद्राच्या आदर्श विचारांचा प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून हि शोभायात्रा आयोजित करण्यात आली असून प्रत्येकाने श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी गडहिंग्लज नुल मठाचे स्वामीजी चंद्रगिरी  महाराज,शहर देवस्थान समितीचे रणजित चव्हाण पाटील,  माजी महापौर मालोजी अष्टेकर ,महाराष्ट्र एकीकरण समितीचे विकास कलघटगी, आर. एम. चौगुले, आर. आय पाटील,अमर येळळूरकर,रमेश मोदगेकर आदींनी मनोगत व्यक्त केले तरमहादेव पाटील,मदन बामणे,अमित देसाई,सागर पाटील,किरण हुद्दार आदींनी आदी उपस्थित होते.Ramsena rally

या शोभायात्रेत तरुणांचा उत्साह ओसंडून वाहात होता. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले श्रीरामभक्त सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. लाठीमेळ्याची प्रात्यक्षिके, डीजेच्या तालावर जल्लोष करणारी तरुणाई आणि मावळ्यांच्या वेशातील बालचमू मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.