बेळगाव लाईव्ह : रविवार दि. १९ मार्च रोजी येळ्ळूर येथील राजहंसगडावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण सोहळा आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाच्या तयारीसाठी मागील १५ दिवसांपासून समिती नेत्यांसह कार्यकर्तेही युद्धपातळीवर तयारी करत असून रविवारी होणाऱ्या भव्य कार्यक्रमासाठी समिती नेत्यांसह कार्यकर्ते शिध्यासह राजहंसगडावर रवाना झाले आहेत.
रविवार दि. १९ मार्च रोजी राजहंसगडावर आयोजिलेल्या महाप्रसादासाठी शहर म. ए. समितीच्या रामलिंग खिंड गल्ली येथील कार्यालयात अनेकांनी देणगीदाखल शिधा सुपूर्द केला होता.
हा सर्व शिधा एकत्रित करून शनिवारी राजहंसगड सोहळा कमिटीच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, ऍड. सुधीर चव्हाण, आर. एम. चौगुले, , दीपक पावशे, एम. जी. पाटील यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत राजहंसगडाकडे रवाना करण्यात आला.
या सोहळ्यासाठी प्रशासकीय दबाव आणून विकासकामांच्या माध्यमातून आडकाठी करण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र ऐनवेळी समिती नेत्यांनी यात गांभीर्याने लक्ष घालून हा तिढा सोडवला आहे. राजहंसगडावरील कार्यक्रमास प्रशासनानेही ना हरकत मुक संमती दाखवली असून अभिषेक, महाप्रसाद आणि पूजा करण्यास संमती दर्शविली आहे.
दरम्यान समितीच्या शिष्टमंडळाने. तहसीलदारांची भेट घेतली जल अभिषेक दुग्ध अभिषेक आणि राजहंस गडाच्या पायथ्याशी महा प्रसादाच्या वाटपाची मुक संमती मिळवली.प्रशासनाने समितीला सर्व कार्यक्रम करण्यासाठी मुक संमती दिली आहे.
तहसिलदार बेळगाव यांच्या कडून राजहंस गडावरील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यक्रमाला मुक संमती pic.twitter.com/8om4CzS96I
— Belgaumlive (@belgaumlive) March 18, 2023