बेळगाव लाईव्ह : बेळगाव रेल्वेस्थानकाच्या नुतनीकरणापूर्वी जागा अपुरी पडत असल्याने गोगटे सर्कल येथे आरक्षण कक्ष सुरू करण्यात आला होता.
आता बेळगाव रेल्वेस्थानकाच्या नव्या इमारतीत आरक्षण कक्ष सुरू करण्यात आला असून अनारक्षित एक्स्प्रेसच्या तिकिटासोबतच आरक्षण कक्ष सुरू करण्यात आल्याने प्रवाशांची धावपळ कमी झाली आहे.
एकाच ठिकाणी तात्काळ तिकीट काढण्यासाठी एव्हीटीएम, आरक्षण केंद्र व तिकीट कक्ष सुरू झाल्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होत आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत एकाच ठिकाणी आरक्षण व तिकीट कक्ष उपलब्ध करून दिल्याने रेल्वे प्रवाशांची रेल्वेस्थानकापासून आरक्षण केंद्रापर्यंत होणारी धावपळ थांबली आहे.

सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर रेल्वेस्थानकात आरक्षण केंद्र सुरू केले आहे. आगाऊ बुकिंगसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
तात्काळ तिकीट मिळविण्यासाठी एव्हीटीएम मशीनदेखील कार्यान्वित केल्या आहेत. यामुळे प्रवाशांना तिकीट काढणे सोयीस्कर ठरत आहे.