Thursday, December 19, 2024

/

कडकडत्या उन्हात देखील मराठी अस्मितेचा अपूर्व उत्साह

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सीमाभागात मराठी भाषिकांची जाणीवपूर्वक करण्यात येत असलेल्या कुचंबणेचा हळूहळू उद्रेक होऊ लागला आहे. मराठी भाषिकांची अस्मिता, स्वाभिमान आणि दैवतांसोबत करण्यात आलेल्या राजकारणानंतर प्रत्येक मराठी भाषिक जागा झाला असून याच अस्मितेचा हुंकार आज राजहंसगडावर दिसून येत आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठी भाषिक राजहंसगडावर एकवटले असून पारंपरिक वाद्य,हलगी, टाळ-मृदूंग, भजन आणि अभंगाचा ठेका, शिव-शंभू पोवाडे आणि सर्वत्र भगवेमय वातावरण अशा पद्धतीने राजहंसडगावरील वातावरण भारून निघाले आहे.

मराठी मते मिळविण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय पक्षांनी चालविलेला आटापिटा आणि मराठी भाषिकांच्या भावनेशी खेळ करत सुरु असलेल्या राजकारणाला अखेर मराठी भाषिकांनी राजहंसगडावरून थेट उत्तर दिल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. कुकर, मिक्सर, साड्या, भांडी, पैसे किंवा इतर कोणत्याही भेटवस्तूचे आमिष न दाखवता केवळ समितीच्या हाकेवर आणि मराठी स्वाभिमानासाठी जमलेली गर्दी राष्ट्रीय पक्षांना खूप काही सांगून जात आहे.Rush fort  rajhans gad

मराठी भाषिकांच्या अस्मितेचा हा उत्साह दिवस जसजसा डोक्यावर येत आहे तसतसा अपूर्व उत्साहात द्विगुणित होताना पाहायला मिळत आहे. गडाच्या पायथ्यापासून सुरु झालेल्या शोभायात्रेतून देण्यात आलेल्या घोषणा, नेतेमंडळींच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निघालेली पालखी मिरवणूक यामुळे राजहंसगडावरील वातावरण शिवमय झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.