महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राजहंसगड येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीला महाअभिषेक घालण्यात येणार आहे.रविवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळी ११.००वर हा कार्यक्रम होणार आहे.
बेळगाव तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की सदर कार्यक्रमानिमित्त महाअभिषेक व महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे. तरी या महाप्रसादाला जे कार्यकर्ते स्वइच्छेने वस्तू व आर्थिक स्वरूपात देणगी द्यायचे आहे.
ज्यांना कुणाला देणगी द्यायची असल्यास बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कॉलेज रोड येथील कार्यालयात शनिवार दिनांक 18 रोजी दुपारी चार पर्यंत जमा करायचे आहे. ही देणगी जमा करून कार्यकर्त्यांनी आपली पोचपावती घेण्याची आहे.
या महाभिषेकला मोठ्या संख्येने बेळगाव तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, महिला आघाडी कार्यकर्त्यांनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, शिवभक्तंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावयाचे आहे असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व चिटणीस वकील एम जी पाटील यांनी केले आहे.
मध्यवर्ती समितीचे आवाहन
राजहंस गडावरील सोहळ्यात हजारोंच्या संख्येने सामील व्हा :म. ए. समितीचे आवाहन
बेळगाव लाईव्ह : रविवार दिनांक 19 मार्च रोजी येळ्ळूर येथील राजहंस गडावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा शुद्धीकरण सोहळा तसेच दुग्धाभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याचबरोबर सिद्धेश्वर देवस्थानात महाअभिषेक देखील आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यासाठी सर्व समिती कार्यकर्त्यांनी तसेच शिवप्रेमी बंधू भगिनींनी कार्यक्रमास भगवे फेटे, भगव्या टोप्या, शिवशाहीला साजेशा पारंपरिक पेहरावात हजर राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
या सोहळ्यादरम्यान महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. रायगडावर ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले जाते त्याच धर्तीवर बेळगाव परिसरात या सोहळ्याचे आयोजन केले असून या कार्यक्रमास वेगळे परिमाण लाभले आहे. तरी समस्त शिवभक्तांनी हा सोहळा अभूतपूर्व करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा, राजहंस गडाच्या पायथ्याशी शोभायात्रेसाठी सर्व जनतेने आणि कार्यकर्त्यांनी सकाळी ठीक १०.३० वाजता जमावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर आदींनी केले आहे.