धामणे विभाग समितीची बैठक शुक्रवारी मासगौंडहट्टी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिवाजी गल्ली पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अप्पाजी आनंद पाटील होते. यावेळी म. ए. समितीच्या पाठीशी थांबणे आणि 19 मार्च रोजीच्या राजहंसगड येथील दुग्धाभिषेक आणि शुध्दीकरण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार करण्यात आला.
राहुल बाळेकुंद्री यांनी स्वागत केले तर यल्लाप्पा रेमानाचे यांनी प्रास्ताविक करताना तरुण युवकांची गाव पातळीवर संघटना बळकट करणे आवश्यक असून महिला आघाडी स्थापन करुन महिलांना मुख्य प्रवाहात सामील करुन घेऊया तसेच धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती बळकट करण्यासाठी व आगामी विधानसभा निवडणुकीत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहूया असे मत व्यक्त केले.
राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक होणार आहे. या कार्यक्रमला धामणे भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे तसेच याबाबत अधिक प्रमाणात जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अप्पाजी पाटील यांनी येणार्या निवडणुकीच्या काळामध्ये राष्ट्रीय पक्ष पैशांच्या अमिष दाखवतील त्याला आपण बळी न पडता आपली मराठी अस्मिता दाखवावी असे अध्यक्षीय भाषणात सांगितले.
निंगाप्पा येळवी यांनी यापुढील समितीचा लढा तरुण युवकांनी चालवावा.समितीच्या झेद्याखाली युवकांनी कार्य करावे असे आवाहन केले. महादेव तुळजाई यांनी समितीचे आज पर्यंत निष्टीने कार्य केले आहे. युवकांनी सुद्धा त्याच निष्टेने कार्य करावे अशी सूचना केली, ज्ञानेश्वर मेलगे, श्रीनाथ येळवी, यांनी शिवप्रतिष्ठानवतीने जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
बाळू केरवाडकर, विजय बाळेकुंद्री,मनोहर मेलगे, शिवाजी पाटील, मंजुनाथ तारीहाळकर, प्रमोद तुळजाई,कोमांना कोमाणाचे, यल्लाप्पा चौगुले, काशिनाथ येळवी, फकीरा सावंत, विश्वनाथ येळवी, उत्तम येळवी,राजू बाळेकुंद्री, दशरथ येळूरकर, परशुराम रामा येळवी, शिवाजी तुळजाई, जगन्नाथ येळवी, राजू मेलगे, ज्योतिबा बाळेकुंद्री, परशराम अवचारी, सोमनाथ मेलगे, पिराजी मेलगे, मोहन मेलगे, दाजीबा येळवी,महादेव मेलगे, कृष्णा धामणेकर,सतीश शहापूरकर, सिद्धार्थ शहापूरकर,परशराम बुकमूर, आनंद तुळजाई, सतीश मेलगे, विनायक येळवी,
दत्ताजी मेलगे, प्रल्हाद तुळजाई, धाकलू बुकमुर, दीपक मेलगे, रवींद्र मेलगे, हरी मेलगे, यल्लाप्पा शिवाजी तुळजाई, यल्लाप्पा नारायण तुळजाई, परशराम तुळजाई,दशरथ मेलगे, धोंडीबा मेलगे, तुकाराम सावंत, दीपा तुळजाई, जयश्री बाळेकुंद्री, शिवानी तुळजाई, निकिता तुळजाई, अनिता तुळजाई, अनिता औचारीरवींद्र मेलगे,रेखा मेलगे, सुनिता मेलगे, मालन मिलगे, अर्चना मेलगे,विद्या मेलगे, देविका मेलगे, रेखा दीपक मिलगे, वंदना बाळेकुंद्री, द्रोपदा येळवी कार्यकर्त्या उपस्थित होत्या