कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून आंतरराज्य सीमेवर एकूण 24 चेकपोस्ट अर्थात तपासणी नाके स्थापना झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (डीसी) नितेश पाटील यांनी दिली आहे.
निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराज्य सीमेवर स्थापण्यात आलेल्या 24 चेकपोस्ट पैकी 20 चेकपोस्ट कर्नाटक -महाराष्ट्र सीमेवर उभारण्यात आले असून उर्वरित 4 चेकपोस्ट गोवा सीमेवर स्थापण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्धीसाठी उभारण्यात आलेले राजकीय पक्षांचे पोस्टर्स, बॅनर्स आणि इतर साहित्य हटविण्याची सूचना त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिली आहे.
त्याचप्रमाणे हे पोस्टर्स, बॅनर्स व इतर साहित्य हटविण्याचा खर्च संबंधित राजकीय नेत्याकडून वसूल करण्याची सूचना निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.