Wednesday, December 25, 2024

/

ढोंगी शिवभक्तांनी दाखविला खरा चेहरा!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बहुचर्चित राजहंसगडाच्या विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमावरून गेले १५ दिवस ढोंगी शिवप्रेम दाखविणाऱ्या राजकीय भक्तांनी अखेर आपला खरा चेहरा समोर आणला असून उदघाटन कार्यक्रमासाठी लावण्यात आलेले फलक फाडून शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे.

सीमाभागासह राज्यभरात अनेक ठिकाणी सातत्याने शिवरायांचा अशा पद्धतीने होत असलेला अवमान पाहून शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून ढोंगी शिवभक्तांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

बेळगावमधील मराठी जनतेच्या भावनांशी नेहमीच राजकारणी खेळ करत आले आहेत. इतर वेळी मराठी भाषिकांकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या राजकारण्यांचे निवडणुका नजरेसमोर ठेवून मराठी आणि शिवाजी महाराजांवरील प्रेम उफाळून येते. निवडणुका जवळ आल्या कि मराठी जनतेला विकासाचे गाजर दाखवून आणि त्यांच्या भावनेला हात घालून मतांचा जोगवा मागण्यात येतो. यामुळे अशा ढोंगी राजकारण्यांना आता धडा शिकविण्याची गरज असल्याचे ठाम मत शिवभक्तातून आणि मराठी भाषिकांतून व्यक्त होत आहे.Rajhans gadh

मागीलवेळी बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली. यावेळी राजकीय पक्ष आणि नेते डोळे मिटून शांत होते. या प्रकारावर कोणतीही प्रतिक्रिया न देणाऱ्या राजकारण्यांनी सीमाभागात मात्र निवडणुका नजरेसमोर ठेवून शिवाजी महाराजांवरून जाणीवपूर्वक गलिच्छ राजकारण करण्यास सुरुवात केली आहे. राजहंसगडावरील शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण असो, किंवा राजहंसगडावरील विकासकामे असोत अशा सर्व पद्धतीने सध्या मराठी मते मिळविण्यासाठी राजकारण सुरु आहे.

नेहमी निवडणुकीच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषिकांना हाताशी धरून राजकारण करू पाहणाऱ्या नेत्यांना एरव्ही या गोष्टींची आठवण का येत नाही? असा जाब मराठी भाषिक जनता विचारत आहे.

येळ्ळूर येथे फाडण्यात आलेल्या फलकांची दृश्ये सोशल साईटवर व्हायरल झाली असून हे कृत्य करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.