Wednesday, December 25, 2024

/

अधिकृत उमेदवारांच्या घोषणेची उत्सुकता शिगेला

 belgaum

बेळगाव लाईव्ह : २०२३ सालच्या विधानसभा निवडणुकीची तयारी गेल्या वर्षभरापासून इच्छुकांकडून सुरु आहे. अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी इच्छुकांची मांदियाळी आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार कंबर कसली असून पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी अर्जही सादर केले आहेत.

निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करणे हि देखील पक्षांमधील मोठी चढाओढ असते. तोडीस तोड उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणे हे पक्षश्रेष्टींसमोर आव्हान असते. येत्या आठवड्यात किंवा पंधरवड्यात निवडणुकीची घोषणा होईल. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु झाले आहे. बेळगावमध्ये भाजप काँग्रेस सह महाराष्ट्र एकीकरण समितीचीही तगडी टक्कर मिळणार असून अधिकृत उमेदवार यादीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही दिवसांपासून राजकीय वर्तुळातही हालचाली वाढल्या असून सभा, समारंभ, मेळाव्याच्या माध्यमातून मतदारांची मोटबांधणी व्यापकपणे सुरु आहे. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारीकडे सध्या साऱ्यांच्या नजरा लागल्या असून बेळगावमधील ग्रामीण, उत्तर, दक्षिण आणि खानापूर विधानसभा मतदार संघात सामान्यपणे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी ४ मतदार संघ वगळता उर्वरित १४ मतदान संघात विविध प्रादेशिक पक्ष व अपक्ष उमेदवार आणि राष्ट्रीय पक्षांमध्येच लढत असणार आहे.

विविध प्रादेशिक पक्षांसह बेळगाव, खानापुर मधून महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार निवडणूक आखाड्यात असणार आहे. राज्यात प्रादेशिक पक्षांसह राष्ट्रोय पक्षांचे अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांची घोषणा होण्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

इच्छुक उमेदवार, पक्ष यासह प्रशासनानेही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरु केली असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मद्यसाठ्याविरोधात कारवाई, रोकड जप्तीसह अमिष दाखविणाऱ्यांविरोधात कारवाई हाती घेतली जात आहे.

जिल्हा निवडणूक विभागाकडून कृतीशिल पावले उचलताना दिसत आहेत. प्रादेशिक पक्षांसह राष्ट्रीय पक्षांनी प्राथमिक उमेदवारी यादी घोषित केली जात असून विद्यमान लोकप्रतिनिधींसह इतर इच्छुकांची नावेही यादीतून पुढे येत आहेत. पुढील आठवड्यात पहिली यादी दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडून घोषित होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.