मंडोळी रोड येथील शंभर वर्षे जुन्या वडाच्या झाडाला तोडल्या नंतर शेकडो नागरिक आणि पर्यावरण प्रेमीनी निषेध व्यक्त केला होता.
वैयक्तिक स्वार्थापोटी मंडोळी रोड येथील एक विशाल वृक्ष गेल्या गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आला. या कृतीच्या निषेधार्थ तसेच तोडलेल्या झाडांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बी एस एन संस्थेने चिपको आंदोलन हाती घेतले होते.
युवक महिला अबाल वृद्ध यांनी त्या वडाच्या झाडाला मिठी मारत चिपको आंदोलनात सहभाग घेतला आणि त्या झाडा प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी अनेक स्थानिक नागरिकांनी येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. झाडे आपल्याला केवळ ऑक्सिजनच देत नाहीत तर सावलीही देतात, वातावरणातील विषारी वायू शोषून घेतात, तापमान नियंत्रित करतात, मातीची धूप रोखतात आणि बरेच काही फायदे झाडा मुळे होतात.
जर एखादे झाड कमकुवत असेल तर सबब आहे पण निरोगी झाडे तोडू नयेत अशी भावना यावेळी झाडाला मिठी मारणाऱ्यानी व्यक्त केल्या.
अनोख्या पद्धतीने केला प्रशासनाचा असा निषेध
कत्तल केलेल्या त्या वडाच्या झाडाला मिठी मारत नागरिकांनी केलं चिपको आंदोलन pic.twitter.com/QgBB1hfhaX
— Belgaumlive (@belgaumlive) March 26, 2023