बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर सीसीबी पोलिसांच्या कारवाईत अनधिकृतरित्या साठवलेला सुमारे ५,३७,५०० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकाला अटकही करण्यात आली आहे.
बुधवारी (दि. १५) रात्री मिळालेल्या अधिकृत माहितीच्या आधारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एपीएमसी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सदाशिव नगर येथील घरात अनधिकृतपणे साठविण्यात आलेले गोवा बनावटीचे मद्य मद्य जप्त केले आहे.
सुमारे ५,३७,५०० रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा ४७५ लिटर मद्यसाठा यासह यामध्ये सहभागी असलेला आरोपी हरीश रमेश भस्मे (वय ३५, रा. शेट्टी गल्ली, बेळगाव) याला अटक करण्यात आली आहे.
यामध्ये सहभागी असलेला राजेश केशव नायक हा आरोपी मात्र फरारी झाला आहे. यासंदर्भात पोलीस पुढील तपास घेत आहेत.
या कारवाईत सहभागी झालेले सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला तसेच सीसीबी आणि एपीएमसी पोलीस स्थानकाचे कर्मचारी या सर्वांचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी कौतुक केले आहे.